एवन टेक्स्टटाईल चा उदघाटन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न

जामखेड प्रतिनिधी

मी जामखेडला बारा वर्षानंतर आले आहे परंतु व्यवसायाच्या माध्यमातून जामखेडचे भविष्य प्रत्येक क्षेत्रात उज्वल आहे. एवन टेक्स्टाइल दालन हे मी पाहिले या दालनाचे मी खुप कैतुक करते. कारण दालन पहील्या नंतर व राऊत आणि बोराटे परीवाराचे आसलेले लोकांन सोबतचे वाढते ऋणानुबंध या मुळे एवन टेक्स्टाइलचा प्रवास व्यवसायाच्या माध्यमातून उंचावणार आहे आसे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

एवन टेक्स्टटाईल मध्ये खरेदी करणाऱ्या 5 ग्राहकांचा सन्मान यावेळी करण्यात आला हे गिफ्ट योजना सांगण्यात आली नव्हती पहिल्या खरेदी करणाऱ्या पाच ग्राहकांनाचा सन्मान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला

जामखेडकरांचा रुबाब वाढवण्यासाठी व संपुर्ण कुटुंबाचं वस्त्रदालन म्हणून ओळख होत आसलेल्या जामखेड शहरातील नव्याने सुरू झालेल्या एवन टेक्स्टाइल या चारमजली भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खा.सुजय विखे, ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, पांडुरंग शास्त्री (देवा) देशमुख, ह.भ.प रामकृष्ण महाराज रंधवे यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी प्रा .मधुकर राळेभात, डॉ. भगवान मुरुमकर, प्रसिद्ध व्यापारी रमेश गुगळे, सुर्यकांत मोरे, डॉ भास्कर मोरे, नगरसेवक अमित चिंतामणी, मंगेश आजबे, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, भानुदास (बाप्पू) बोराटे, साधु (नाना) बोराटे, संजय वराट, प्रा. अरुण वराट ,आण्णासाहेब सावंत, नारायण राऊत, महेश राऊत डॉ.रोहन बोराटे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, आण्णा व विखे पाटील घराणे यांचा संबंध खुप जुना आहे. अण्णांच्या आशिर्वादाने जामखेड परिसरात एवन टेक्सटाईल च्या रूपाने नवे दालन सुरू होत आहे. यासाठी शुभेच्छा दिल्या. रत्नदिप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष
डॉ. भास्कर मोरे यांनी सांगितले की, जामखेड परिसरातील लोकांची गरज ओळखून जामखेड शहरात एवन टेक्सटाईल सुरू केले. तरूण वर्गाला काय हवे तेच एवन टेक्सटाईल च्या रूपाने राऊत व बोराटे यांनी सुरू केले आहे. उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, आम्ही पन्नास वर्षापासून कापड व्यवसायात आहोत. रोज नवनवीन गोष्टी रोज येतात. एवन टेक्सटाईल ला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन गुगळे यांनी दिले.

हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांनी सांगितले की, बंधुप्रेम बोराटे यांच्या कडून शिकावे, एवन टेक्सटाईलने चांगली सेवा द्यावी ग्राहक आपोआप येतील व्हरायटीत कमी पडू नका जामखेड शहराच्या वैभवात भर पडणारे दालन आहे. ग्राहकांना देव समजा तुमचा व्यापार वाढणार आहे.

यावेळी आखील भारतीय वारकरी शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, जामखेड च्या वैभवात भर घालणारे वातानुकूलित असे एवन टेक्सटाईल झाले आहे. राऊत आण्णानी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जपला अण्णांच्या प्रेमामुळे बहुसंख्य लोक जमले आहेत. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राऊत व बोराटे कुटुंबांनी एवन टेक्सटाईलच्या रूपाने सिमोलंघन केले आहे.

प्रस्ताविक करताना विनायक राऊत म्हणाले की, अण्णांचे स्वप्न साधू नाना बोराटे यांच्या सहकार्याने एवन टेक्सटाईलचे दालन सुरू करत पुर्ण करत आहोत. हे दालन आपले सर्वांचे आहे. प्रत्येकाला आपले वाटेल अशी सेवा देऊ असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार विनायक राऊत यांच्या भगिनी श्रुती राऊत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *