*मा.आ.श्री.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा जाहीर सत्कार*

*अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा.आ.श्री.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा जामखेड येथे तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.*
*जिल्हा बँक हि ठेवीदारांनी ठेव ठेवल्याच्या विश्वासावर चालते. त्यामुळे कर्ज वाटप करणे जेवढे महत्वाचे आहे,तेवढेच महत्त्व आपण वसुलीस दिले पाहिजे. बँकेने ग्राहकांसाठी मोबाईल नेट बँकिंग तसेच इतर अनेक बँकिंग सुविधा सुरु केल्या असून त्याचा जास्तीत जास्त खातेदारांनी वापर करावा.तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न मे.चेअरमन साहेब यांनी करावा अशी आग्रहाची मागणी जिल्हा बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांनी व्यक्त केली. तसेच तात्यांप्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हेच आपले मुख्य काम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.*

*बँकेचे चेअरमन साहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची मर्यादा वाढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच प्रास्ताविकमध्ये विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी बँक नोकर भरतीसाठी नाबार्डची परवानगी मागवली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरु करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कर्जाची मर्यादा १२०००० वरून ३००००० करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.याशिवाय बँकेच्या एकरकमी परतफेड योजनेचा जास्तीत जास्त थकबाकीदार सभासदांनी लाभ घ्यावा.

असे आवाहन केले.जामखेड तालुका हा जिरायत भाग असून मी सुद्धा जिरायत भागाचेच नेतृत्व करत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.स्वर्गीय तात्या यांचेसोबत मी गेली १५ वर्षे काम केले असून तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुधीर व अमोल हे त्यांची दोन्ही मुले काम करत असून आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा मी कायम त्यांना खंबीर साथ देत राहील.तसेच जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कायम सहकार्याची भूमिका घेतली जाईल असा विश्वास चेअरमन साहेब शेवटी व्यक्त केला.*

*या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील मार्केट कमेटीचे माजी सभापती सुधीर (दादा) राळेभात, उपसभापती कैलास वराट, नारायण जायभाय, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, अंकुश ढवळे, अशोक पवार,सतीश ढगे तसेच सहकारी संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब आजबे,शहाजी पवार,बबन ढवळे,महादेव देडे,महादेव डिसले,गणेश चव्हाण, राजू बारवकर, अमृत पाटील, किसन बोराटे, बलभीम परकड, अनंता सावंत, आश्रु उगले, राजेंद्र मोटे,सोमनाथ घुमरे, केशव कात्रजकर, मकरंद काशीद, अशोक महारनवर,

अविनाश पवार, महादेव डूचे, लक्ष्मण कोल्हे, संजय भोंडवे, नारायण भोंडवे, दादाहरी थोरात, बाबासाहेब इथापे, पृथ्वीराज वाळूंजकर, ब्रम्हदेव शिंदे, किसन ढवळे, सतीश ढगे, शहाजी केसकर, तुराब शेख, गोकुळ नेटके, साहेबराव बांगर, नवनाथ जावळे, अशोकराव लेंडे याशिवाय व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, बँक कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्केट कमेटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. श्री. सुधीर दादा राळेभात यांनी आभार मानले.*
,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *