अकाश बाफना यांनी आपली कन्या क्रिषा बाफना च्या वाटदिवसानिमित्तने दिले निवारा बालगृह येथे दोन खोल्या बांधण्याचे अश्वासन….
जामखेड प्रतिनिधी
मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र आदर्श फाउंडेशन तर्फे, आकाश बाफना यांनी सामाजिक बांधिलकी राखत चिरंजीवी क्रिषा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसा निमित्त जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा येथे मुलींच्या वसतिगृहात मुलींच्या निवारासाठी रूम बांधून देण्याचे प्रथम वाढदिवसानिमित्त अवचित्य साधले आहे.पुरुषप्रधान देशात या नवीन पिढीत खूप बदल झाला आहे.
सुशिक्षित समाज मुलगा व मुलगी आता एकसमान मानायला लागले आहेत याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आकाश बाफना यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जाणिवेच्या भावनेतून ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) येथे मुलींच्या वसतिगृहात मुलींच्या निवारासाठी रूम बांधून देण्याचे जाहीर केले.
यावेळी युवा उद्योजक आकाशेठ बाफना, माझी जिल्हा परिषद चेअरमन दिलीपशेठ बाफना, उद्योजक लखीचंद जी बाफना, उद्योजक अशोक काका शिंगवी, उद्योजक महेश नगरे, उद्योजक गौतम बाफना, उद्योजक यश बाफना, बाळासाहेब नवसरे, कृष्णराव चौहान सर, परशुराम भांगे, दत्तात्रय जगताप व बाफना परिवार सर्व महिला वर्ग उपस्थित होते.