*भटक्यांच्या घरासाठी खर्डा येथून निघणार बिऱ्हाड पदयात्रा -ॲड .डॉ.अरुण (आबा) जाधव*
जामखेड प्रतिनिधी,
आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी खर्डा येथील मदारी समाजासाठी मंजूर असलेल्या यशवंतराव मुक्त वसाहतीचे बांधकामास तात्काळ मान्यता मिळावी अन्यथा खर्डा गाव तेअहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बिऱ्हाड पदयात्रा काढण्यात येणार आहे.याबाबत जामखेडचे तहसीलदार मा.योगेश चंद्रे साहेबांना निवेदन देण्यात आले.
2016 साली खर्डा ता.जामखेड गावातील पालात राहणाऱ्या मदारी समाजास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने-अंतर्गत वीस कुटुंबांना घरकुल वसाहतीस मान्यता मिळून निधी वर्ग झाला होता पण अधिकारी व राजकीय पुढार्याच्या श्रेय वादातून ते तसेच लाल फितीत अडकून पडले आहे.
अठराविश्व दारिद्र्य असलेला हा मदारी बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण,विदर्भ,मराठवाडा या भागामध्ये आपल्या चिल्या पिल्लांसाठी जादूचे खेळ,प्राण्यांचे खेळ,शोभेचे गोंडे,गाड्यांना डिझाईन व भंगार काच पत्रा गोळा करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. या मदारी बांधवांना राहण्यासाठी घर नाही.स्वतःची जागा नाही नागरिकत्वाचे पुरावे नाही व्यवसाय नाही असा हा अत्यंत गरीब व इमानदार समाज…
*छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक म्हणून मदारी समाजातील मदारी मेहतर होते.*
पण आज पुढाऱ्याच्या श्रेय वादातून या गरीब मदारी समाजाला राहण्यासाठी घर नाही. *जी हर घर तिरंगा घोषणा केली जाते.ज्यांना घर नाही त्यांचं काय ?* हे का पुढाऱ्यांच्या लक्षात येत नाही. या पालात राहणाऱ्या मदारी समाजास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी आतापर्यंत सहा आंदोलने विविध सरकारी कार्यालयासमोर झाली पण मदारी समाजाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी सकाळी खर्डा गावातून अहमदनगर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर पायी बिऱ्हाड पाठीवर घेवून जिल्हाधिकार्याना आपली कैफियत मांडायला येणार आहेत. याची दखल घेवून आम्हास न्याय द्यावा म्हणून खर्डा ते जामखेड 28/8/23 जामखेड ते कडा फॅक्टरी 29/8/23 कडा फॅक्टरी ते चिचोंडी पा.30/8/23 चिचोंडी पा.ते नगर जिल्हाधिकारी कार्यालय 31/8/23 भटके विमुक्त दिनानिमित्त अशा पदयात्रेचा प्रवास आहे.तसेच वसाहतीचे बांधकाम सुरू होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जर तेथे प्रश्न न सुटल्यास पुन्हा तातडीने मुंबई या दिशेने बिऱ्हाड यात्रा निघेल व मुख्यमंत्री यांच्या निवासासमोर मुंबई येथे बिऱ्हाड आंदोलन करेल यावेळी भटके मुक्त समाज्याची मानवहानी जीवितहानी व आर्थिक होणाऱ्या सर्व हानीस महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असे ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव म्हणाले.
यावेळी मा.बापूओहोळ (लोकाअधिकार आंदोलन प्रवक्ते) मा.आतिश पारवे (ता.अध्यक्ष वं .ब.आ) भिमराव चव्हाण (वं.ब.आ.संघटक) योगेश सदाफुले (वं.ब.आ.उपाध्यक्ष) अजिनाथ शिंदे (वं.ब.आ.शहर अध्यक्ष) उमा (ताई) जाधव विशाल पवार, व्दारका पवार, गणपत कराळे,दिपाली काळे,सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, रजनी औटी, राजू शिंदे, तुकाराम पवार,नंदकुमार गाडे,फरिदा शेख,शुभांगी गोहेर,काजोरी पवार,राहूल पवार, शहानुर काळे, डीसेना पवार,सुनीता बनकर,उज्वला मदने,पल्लवी शेलार,रोहिणी राऊत,लता सावंत,ममीता पावरा,हुशेन मदारी, सलीम मदारी,मुस्तफा मदारी, सरदार मदारी, फकिरा मदारी,ऋषिकेश गायकवाड,तुकाराम शिंदे,वैजिनाथ केसकर यावेळी उपस्थित होते व याविषयीची माहिती संतोष चव्हाण यांनी दिली