जामखेड करानी अनुभवला कुस्त्यांचा थरार…

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षही कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांच्या वतीने लना होषिंग या ठिकाणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
जामखेड ची नागपंचमी महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने परिचित होती परंतु गेल्या अनेक वर्षंपासून कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या समरणार्थ उप महाराष्ट्र केसरी बबन काका काशीद, मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांनी ही जुनी ओळख पुसून कुस्तीच्या माध्यमातून एक नवी ओळख महाराष्ट्राला करून दिली
महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील पैलवान यांनी या आखाड्यास हजेरी लावली आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला कुस्तीगीर यांनी देखील हजेरी लाऊन आखाड्यात एक वेगळी रंगत आणली, अनेक देखण्या कुस्त्या यानिमित जामखेडकराना पहायला मिळाल्या नागपंचमी निमित्त एक वेगळी पर्वणी अनुभवायला मिळाली. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री 9 वाजेपर्यंत चालू होत्या विशेष म्हणजे कुस्ती शौकिनांची गर्दी उल्लेखनीय होती आणि आणखी महत्वाची बाब म्हणजे अनेक महिला भगिनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अजय दादा काशीद मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते या बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम याठिकाणी राबवण्यात येतात यावर्षी अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे तसेच आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले ले सुजय तनपुरे यांचा सन्मान, मराठी भाषिक संघ अध्यक्ष इंदोर सौ.स्वातीताई काशीद आणि मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांनी इंदोर या ठिकाणी 9.5 फुटी जिजामाता प्रतिमा सिंदखेड राजा ते इंदोर पदयात्रा काढून बसवली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला,लना होशिग शाळेसाठी क्रीडा साहित्य, जिजामाता पुस्तकाच्या सर्व शाळांसाठी तीन हजार प्रती वितरण करण्यात आल्या.

कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक अजय दादा काशीद यांच्या वतीने दर वर्षी जामखेड येते आयोजित करण्यात येते आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोसाहन मिळत असते यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अजय काशीद यांचे विशेष आभार मानले जात आहेत. कार्यक्रमासाठी परमपूज्य संत श्री 1008 महामंडलेश्वर दादुजी महाराज शनी पुत्र इंदोर, महादेवा नंद भारती महाराज , प्रेमानंद महाराज, शिवाजी महाराज येवले, अहिल्या देवीचे वंशज दीपक शिंदे,स्वप्नील गौड इंदोर, अक्षय भैय्या, लोकेश वर्मा, सागर धस, डॉक्टर भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचर्णे, शरद कार्ले , गौतम उतेकर, आदी जन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय दादा काशीद यांनी तर आभार नारायण राऊत यांनी मानले.

अनेक दैदिप्यमान अश्या कुस्त्या यावेळी जामखेड कराणी पहिल्या यामधे सौरभ गाडे आणि अविनाश शेटे यांच्यात अविनाश शेटे विजयी झाले, विशाल माने सांगली आणि विजय पवार पुणे ही कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली तसेच नंबर एकची कुस्ती समीर शेख सोलापूर आणि युवराज चव्हाण नगर यांच्यात होऊन समीर शेख विजयी झाला.या कुस्तीचा मान आणि बक्षीस आमदार राम शिंदे साहेब यांचा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *