पुरूषोत्तम तथा अधिकमासानिमित्त हभप प्रकाश महाराज बोधले यांचे हरिकीर्तन

जामखेड प्रतिनिधी,

पुरूषोत्तम तथा अधिकमासाच्या पुण्यकाळात संत सज्जन आणि गुरू भेटीचा स्नेहमेळावा या निमित्त आखील भारतीय वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांचे हरिकीर्तन शुक्रवार दि. ११ आँगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ११.३० विठ्ठल मंदिर जामखेड येथे हरिकीर्तन होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

पुरूषोत्तम तथा अधिकमासाच्या पुण्यकाळात संत सज्जन आणि गुरू भेटीचा स्नेहमेळावा या निमित्त आखील भारतीय वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांचे हरिकीर्तन दर्शन सोहळा व गुरूदिक्षा शुक्रवार दि. ११ आँगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ११.३० विठ्ठल मंदिर जामखेड येथे हरिकीर्तन संपन्न होईल.

सकाळी ९ ते ९.३० संताच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन तसेच सकाळी ९.३० ते ११.३० हरिकीर्तन तसेच दुपारी १२ ते ०१ इच्छुकांना गुरूदिक्षा व दर्शन सोहळा व नंतर धोंडे जेवणाची महापंगत होईल.

तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड परिससरातील भाविक भक्त व वारकरी भजनी मंडळ जामखेड यांनी केले आहे.

चौकट

धोंडे जेवणाची महापंगत सहकार महर्षी वै. जगन्नाथ (तात्या) राळेभात यांच्या स्मरणार्थ जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात सह राळेभात परिवाराची होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *