चौंडी येथील उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही झाले तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील – धनगर समाज आक्रमक

जामखेड प्रतिनिधी
धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही झाले तर याचे परिणाम सरकारला सोसावे लागतील. चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तसेच धनगर समाजाला अनुसूचित जातीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी समाजाच्या वतीने जामखेड येथील खर्डा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
धनगर व धनगड हे एकच आहेत. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देतो म्हणून सांगितले होते, मात्र सत्ता आल्यावर दिले नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव चौंडी येथे अमरण उपोषणास बसले आहेत. मात्र अकरा दिवस होऊनही राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. मात्र चौंडी येथिल उपोषण कर्त्यांच्या जीवाला काही झाले तर याची झळ सरकारला सोसावी लागेल. आशा संतप्त भावना रास्तारोको दरम्यान धनगर बांधवांनी व्यक्त केल्या.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे अमरण उपोषण उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समिती व सर्व पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक या ठीकाणी शनिवार दि १६ रोजी सकाळी रास्ता रोको
आंदोलन करण्यात आले आहे. खर्डा चौकातील रास्ता रोको करण्यात आले
 चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने धनगर बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. मात्र राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ सुजय विखे हे जामखेड दौरा टाकतात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे झालेला दौरा रद्द करतात मात्र उपोषणस्थळी भेट देण्यासाठी त्यांना वेळ नाही याचा अर्थ काय? असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला.
आरक्षण लागु करणाऱ्यांनाच मतदान करणार धनगर व धनगड हे एकच आहेत. विरोधी पक्षात भाजप मध्ये देवेंद्र फडणवीस आसताना आरक्षण देतो म्हणून सांगितले व सत्ता आल्यावर दिले नाही. सत्ता देऊनही धनगर समाजाला भुलवत ठेवले. हा लढा एक दिवसासाचा नसतो तर त्याला वेळोवेळी लढावे लागते. धनगर समाजाला लढत ठेऊन मतदानादिवशी आरक्षणाचे गरज दाखवायचे काम प्रत्येक पक्षातील पुढारी करत आहेत. मात्र आता आरक्षण लागू करणाऱ्यांनाच मतदान करणार असे परखड मत उपोषण करताना जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, वंचीत बहुजन आघाडी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड. अरूण जाधव, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, ‌रासपाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे,मोहन देवकाते, ॲड. मोहन कारंडे, डॉ. कल्याण कारंडे, सरपंच महारूद्र महारनवर, अनिल श्रीराम, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, रणजीत कारंडे, किसन चिलगर, गणेश सुळ, मोहन देवकाते, डॉ. कैलास हजारे, मनिष मासाळ, ॲड. संग्राम पोले, माजी पंचायत समिती सदस्य बबन देवकाते, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक अमित जाधव,लक्ष्मण कारंडे, मंगेश आजबे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, सरपंच निलेश पवार, विकीभाऊ सदाफुले, राम शिरगीरे, संतोष गव्हाळे, रमेश आजबे, शरद शिंदे, आदी मान्यवरांसह, धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *