*दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना जळालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी…*
– ॲड. डॉ. अरुण जाधव
जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पावसा अभावी जळालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व जनावरांसाठी चारा छावण्याची सुरुवात करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्यसमन्वक ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी तसे निवेदन काल दि- 28/8/2023 रोजी जामखेड तहसीलदार साहेबांना दिले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ, उद्योजक दादा पाटील दाताळ, शहराध्यक्ष आजिनाथ शिंदे, जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, लोक अधिकार आंदोलन तालुका अध्यक्ष विशाल पवार,योगेश सदाफुले, गणपत कराळे, सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, मच्छिंद्र जाधव, रवी अंधारे, विशाल जाधव, शहानुर काळे, आलीस पवार, अंकुश पवार,मिंठु परखड, रघुनाथ परखड, लोणी सरपंच मिंठु शेंडकर,शिध्दु शेंडकर, आनंदवाडी येथिल शेतकरी सोपान खाडे, हनुमंत सांगळे, पिंपळगाव आवळा येथील विनोद बारवकर,भारत शिंदे गीतेवाडीचे शिवाजी चौधार, विकास गोपाळघरे, बाळगव्हाणचे ग्राम सदस्य सर्जेराव गंगावणे, काका शिकारे, कैलास शिकारे, ग्राम सदस्य राहुल दाताळ, द्वारका ताई पवार, रेश्मा बागवान, राजू शिंदे, संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, तुकाराम शिंदे,वैजीनाथ केसकर हे उपस्थित होते
या निवेदनात म्हटले आहे की हवामान खात्याने 98 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी अगदी धाडसाने कर्ज काढून बियाणे व खते खरेदी करून खरीप पिकाची पेरणी केली आज तालुक्यात 90 ते 95 टक्के पेरण्या झालेल्या आहेत मात्र पावसाने दडी मारल्याने आता शेतकरी उदास चेहरे घेऊन गावच्या पारावर बसत आहेत कर्जबाजारी झाल्याचा तणाव व कुटुंबाची उपजीविका चालवण्याची चिंता यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो.
शेतकऱ्यांनी पेरणी करून 50ते 60 दिवस झाले परंतु कुठेही पाऊस पडला नाही त्यामुळे संपूर्ण पिके जळून गेली असून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सध्या पाऊस पडेल अशी कोणतीही चिन्ह दिसून येत नाही त्यामुळे बळीराजा पुरता धास्तावला आहे त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत कारण मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, कांदा हे पिके जळून गेलेले असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे
जनावरांच्या चाऱ्याचे देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस पुरेसा न पडल्याने कुठेही हिरवा चारा उपलब्ध नाही तसेच विहीर व तलाव देखील कोरडे पडले आहेत त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची हाल सुरू झालेली आहे त्यातच तालुक्यामध्ये जनावरांना लंम्पी आजाराने ग्रासले आहे त्यामुळे शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता *“”शेतकरी बचाव””* असे जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात येणार आहेत,अशी माहिती तालुका अध्यक्ष अतिश पारवे यांनी दिली