विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी , त्याच्या कला गुणांना वाव मिळाला यासाठी त्यांनी सांस्कृतिक स्पर्धेत व शालेय कार्यक्रमात सहभागी व्हावे – गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे…
जामखेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्न गुणांचा विकास व्हावा तसेच त्यांच्या कला गुणांचा वाव मिळावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच शालेय कार्यक्रमात सहभागी व्हावे त्यामुळे त्यांच्यातील कला गुण इतरांना दाखवण्याची संधी मिळते व मुलांचा कला गुणांचा विकास होतो . असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले .
जामखेड तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ल . ना . होशिंग विद्यालयात आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की , शिक्षकांनी मुलांना प्रोसाहन दिले पाहिजे व शिक्षकांनी ही उत्साहाने सहभागी झाले पाहीजे .
जामखेड तालुक्यातील अकरा केंद्रातील प्रथम क्रमांक मिळविलेले लहान गट व मोठा गट यातील संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. वस्तूनिष्ठ व पारदर्शक परीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले .
मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला .
यावेळी विस्तार अधिकारी श्री. सुनिल जाधव, सुरेश मोहिते , केशव गायकवाड, केंद्रप्रमुख श्री. बढे, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .