*जामखेड येथील तपणेश्वरचा राजा वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन व माधुरी पवार हिचा डान्सचा तडका
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील तापणेश्वरच राजा वस्ताद सत्ता ग्रुप यांच्या वतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे या गणपती उत्सवनिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सिने अभिनेता महिलांचे लाडके भाऊजी सिने अभिनेता सुभाष यादव यांच्या कॉमेडी च्या हास्यात साजरा होतोय होम मिनिसटर खेळ पैठणीचा तेव्हा महिलांनो तयारीला लागा चला लवकर पैठणी जिंकायला
कॉमेडीच्या तडक्याबरोबर अभिनेत्री लावणी सम्रादणी माधुरी पवार हिचा डान्स चा जलवा आणि अदाकरी ने जामखेड कर होणार घायाळ तेव्हा सहभागी व्हा.आणि उपस्थित रहा देखणा कार्यक्रम होतोय आपल्या जामखेड शहरात
या बरोबरच सहभागी होणाऱ्या महिलांना मिळणार भरपूर बक्षिसे प्रथम बक्षीस एच यू गुगळे यांच्याकडून-पैठणी व सोन्याची नथ, द्वितीय बक्षीस शीतल कलेक्शन यांच्याकडून-पैठणी व एल ई डी टीव्ही, तृतीय बक्षीस नूर हॅन्डलम कडून-पैठणी व कुलर तसेच अष्टेकर मोबाईल शॉपी कडून उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे तेव्हा महिलांनो सहभागी व्हा व भरपूर बक्षीसे जिंका
अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणी महिला नोकरीं करणाऱ्या महिला यांना कुठे तरी विरंगुळा मिळावा तानणावातून मोकळीक मिळाली पाहिजे महिलांमध्ये सहभागी होता यावे विचारांची देवाणघेवाण व्हावी व आनंद लुटता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान शिवसेना तालुका प्रमुख व माजी सरपंच प्रा कैलास माने सर व श्री.उल्लास वस्ताद माने यांनी केले आहे