पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यासाठी होणारे प्रदुषण थांबवणे ही काळाची गरज बनली असून, त्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करावे- न्यायाधीश बाळासाहेब पवार
जामखेड प्रतिनिधी,
येवला ते गाणगापुर सायकल यात्रेचे सोमवारी (ता.१५) जामखेडला रात्री उशिरा आगमण झाले. यावेळी कोठारी प्रतिष्ठाण आणि जैन कॉन्फ्रेंसच्या वतीने राज लॉन्स येथे विशेष स्वागत सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या यात्रेत सहभागी असलेले न्यायाधीश पवार बोलत होते.
पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्फत पिंपळगाव जलाल ते अहमदनगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर , अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे गेली १८ वर्षापासून दरवर्षी आयोजन करण्यात येते.
यावेळी बोलताना जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले मी आल्यापासून पाहत आहे कोठारी प्रतिष्ठानचे कार्य सामाजिक संजय कोठारी हे चांगल्या प्रकारे जनजागृती सामाजिक काम करतात त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे
अपघातातील लोकांना वाचवायचे काम कोठारी हे नेहमी करत असतात खरोखर त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे असे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले
तसेच यावेळी या सायकल रॅलीचे संयोजक विजय भोरकडे म्हणाले आम्ही जामखेड मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला संजय कोठारी यांनी मदत केली आम्ही विसरणार नाहीत जामखेड पंचक्रोशी मध्ये कुठेही कसलेही घटना घडली तर संजय कोठारी सर्वात पुढे असतात हे मी रोज प्रसार माध्यमातून पाहत आहे खरोखर त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे आज आम्हाला आल्यानंतर त्यांनी सत्कार समारंभ केला त्याबद्दल मी कोठारी साहेबांचा आभारी आहे
जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या स्वागत सभारंभास पोलीस निरीक्षक महेश पाटील , मेहुल सोनी मंडलेचा यांनी सायकल यात्रेत सहभागी असलेले दिवाणी न्यायाधीश डॉ.विक्रम आव्हाड व जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, न्यायाधीश बाळासाहेब पवार, न्यायाधीश संगीता विक्रम आव्हाड यांचा सन्मान करण्यात ॴला.
यावेळी मोडीलिपी अभ्यासक संतोष यादव,कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी , पत्रकार संतराम सूळ , साखर सम्राट अशोक चोरडिया, उद्योजक प्रफुल्ल सोळंकी, कॅप्टन लक्ष्मण भोरे, पोदार लर्न स्कूलचे संचालक निलेश तवटे, उद्योजक मनोज कुलथे , युवा उद्योजक युवराज पोकळे , नगरसेवक दिगंबर चव्हाण, चौसाळाचे सामाजिक कार्यकर्ते उमेश लोढा, राहुल घोरपडे ,राहुल अहिरे , सुमित चानोदिया, सचिन गाडे, राजेश गांधी, सुरज गांधी, राजेंद्र गोरे ,संतोष सुराणा, रोहन कोठारी ,मधुकर तोडकर ,अभिजीत शिंदे, विकास नाईकवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, विजय भोरकडे यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन मिठुलाल नवलाखा यांनी केले तर आभार संजय कोठारी यांनी मानले