जामखेड प्रतिनिधी
सर्व धर्मासाठी जामखेड मध्ये शतावधान पहिल्यांदा संपन्न साध्वी प.पू.प्रफुलाजी महाराज
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील ,उद्योगपती शांतीलालजी गुगळे, डॉ.प्रताप गायकवाड, डॉ. सुरेश काशीद, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे ,उमेशकाका देशमुख, कॅप्टन लक्ष्मण भोरे उपस्थित होते
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील असा अद्भुत कार्यक्रम आज मी पहिल्यांदाच पाहत आहे विचारलेल्या शंभर प्रश्नाचे काही कालांतराने क्रमवार न चुकता माहिती सांगून साध्वीजी परमपूज्य गरिमाजी महाराज आणि दीक्षार्थि मोक्षाजी चोपडा यांनी खरोखर कौतुकास्पद काम केले आहे खरे पाहता आज जन मानसातील लोकांना वेळ नसतो परंतु या जैन साध्वी पायी अनवाणी उन्हा तानाचे चालून जैन धर्माचा प्रचार प्रसार करतात याबद्दल खरोखर अभिमान आहे
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले
कोटा संघ प्रमुखा परमपूज्य श्री प्रतिभाजी म.सा. यांच्या लहान भगिनी आयंबील आराधिका परमपूज्य श्री प्रफुल्लाजी म.सा. यांच्या सुशीष्या परमपूज्य गरिमाजी म.सा. आणि मुमुक्षु मोक्षाजी चोपडा यांच्या उत्कृष्ट साधनाने अद्भुत स्मरण प्राप्त शक्तीच्या प्रती जनमानसामध्ये श्रद्धा भाव जागृत करणे यास शतावधान कार्यक्रम पूर्ण झाला
अद्भुत स्मरणशक्ती चा चमत्कार जैन धर्म कडून शत म्हणजे शंभर प्रश्न लक्षात ठेवणे विचारलेल्या प्रश्नांचे अनियमित क्रमाने उत्तर देणे आत्मा मध्ये व्याप्त असंख्यशक्तीने अकलपनीय द्वारा प्रश्नाचे उत्तर देणे माता सरस्वतीची साधना एवन गुरुकृपा च्या प्राप्त अध्यात्मिक अद्भुत शक्तीचे चष्मदित साक्ष बनण्याचा प्रसंग शतावधान मध्ये उपस्थित जनसमुदाय द्वारा विचारल्या गेल्याचे प्रश्नाचे उत्तर साध्वी परमपूज्य
गरिमाजी म.सा. आणि वैरागन मोक्षाजी चोपडा यांचे कडून पूर्ण झाला आहे
या कार्यक्रमासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, ललित बाफना महेश भंडारी, सुभाष भळगट, अशोक पितले,कांतीलाल भळगट, सुभाष भंडारी चंदुलाल बेदमुथा लखीचंद बाफना, संजय गुंदेचा, सुनील पितळे, अमोल तातेड, कुंदनमल भंडारी, शितल गांधी, अमृत कोठारी, दिलीप गुगळे, शरद शिंगवी, जवाहर गुंदेचा, लीलाचंद मंडलेचा, प्रकाश पितळे , नितीन सोळंकी, गणेश भळगट आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन वर्धमान श्रावक संघ जामखेड, धर्मोदय एकता मंच ,जय गुरु गणेश मंडळ ,आनंद बहु मंडळ, कन्या मंडळ आदीं उपस्थित होते