जामखेड प्रतिनिधी

ग्रामपंचायत मतदार संघात चालला सरांचा करिष्मा, अशी तालुक्यात चर्चा..

याबाबत माहिती अशी की, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या पॅनल मध्ये मोठ्या चुरशीने लढवली गेली, दोन्ही पॅनलला नऊ अशा समसमान जागा मिळाल्या.


खासदार सुजय विखे गटाला मानणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी आमदार राम शिंदे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करीत असताना अचानकपणे आमदार रोहित दादा पवार यांच्याबरोबर एकत्र युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली. त्यांनाही सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असल्याने आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले होेते.


सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणारे प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आमदार रोहित पवार यांचे कान भरवून प्रा. गायवळ यांच्या विरोधात अनेक गोष्टी विनाकार रंगवून सांगितल्या गेल्याचे बोलले जात आहे? व त्यांना आमदार पवार यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे राबविले गेले, परंतु काही नेत्यांनी प्रा. गायवळ यांचे मन वळविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही, त्यामुळे नाईलाजाने प्रा. सचिन सर गायवळ यांनी शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला पाठिंबा देऊन जामखेड तालुक्यात प्रचाराची रणनीती ठरवली व स्वतः जातीने प्रचारात झोकून देऊन सोसायटी मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघात मोठ्या फरकाने विजय संपादन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले व आपले राजकीय अस्तित्व अंतर्गत विरोधकांना प्रथमच दाखवून दिले,याचीच चर्चा निवडणूक निकाला नंतर संपूर्ण तालुक्यात होऊ लागली आहे.


ग्रामपंचायत मतदार संघात त्यांचा करिष्मा कामाला आला त्यामुळे अटीतीच्या निवडणुकीत आमदार पवार यांना 18 जागांपैकी 9 जागा तर आमदार शिंदे यांच्या पॅनलला 9 अशा समसमान जागा मिळाल्या कोणालाच बहुमत नसल्याने जामखेड बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड कशा पद्धतीने रंजक होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एक मात्र खरे आहे की, राजकारणात नवखे असणारे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कामातून सर्वांना मदतीचा हात देणारे प्रा. सचिन सर गायवळ यांच्या भोवतीच जामखेड बाजार समितीची निवडणूक फिरली असल्याचे दिसून आले आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते पुढील राजकीय भूमिका काय घेणार यावर त्यांचे व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे चित्र सध्यातरी जामखेड तालुक्यात दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *