जामखेड प्रतिनिधी
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेले ए वन ट्रेडर्स येथे रात्री चोरटयांनी डल्ला मारला आहे आणि चोरटे पसार झाले आहेत चोरटयांनी रोख २५००० रुपये नेले असून काही माल नेला आहे याचा देखील तपास सुरु आहे
या विषयी सविस्तर असे कि,जामखेड बाजार समितीच्या आवारामध्ये असलेले ए वन ट्रेडर्स हे आडत दुकान आहे या दुकानाचे संचालक रात्री दुकान बंद करून गेले रोजच्या प्रमाणे ते आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांचे ऑफीस त्यांना उघडे असलेले व कुलूप तोडलेले दिसले ते आतमध्ये गेले असता पैशाचे ड्रॉवर उघडे दिसले व त्यातील सामान आस्थावेस्थ दिसले व २५००० रुपये गेल्याचे त्यांना समजले व त्यांनी तात्काळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व बाजार समितीचे सभापती संचालक याना फोन करून बोलावून घेतले व सर्व प्रकार सांगितलं या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे
यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी संचालक दत्तात्रय एकनाथ बोराटे म्हणाले कि मी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तक्रार केली असून सभापती शरद कार्ले व बाजार समितीने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी हि विंनती
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले इथून माघेही ४ ते ५ दुकानंनामध्ये चोऱ्या झालाय होत्या तरी सुद्धा बाजार समितीने कुठलीही दखल घेतली नाही अथवा उपाय योजना केल्या नाही म्हणून आम्ही आज बाजार समितीवर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले सभापती शरद कार्ले यांच्या आश्वासनानंतर आंदोलन माघे घेत आहोत
यावेळी सभापती शरद कार्ले म्हणाले ए वन ट्रेडर्स येथे झालेली चोरी हि खरच दुर्दैवी घटना आहे आम्ही सर्व संचालक मंडळ बोराटे यांच्या सोबत आहोत व इथून पुढे बाजार समितीच्या आवारामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी आम्ही सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार असून ३ राखणदार असून अजून १ राखणदार वाढवणार आहोत व तिन्ही साईटने लोखंडी गेट बसवणार आहोत व त्याला रात्री लॉक करणार आहोत असे आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक सचिन घुमरे,नंदू गोरे ,सुरेश पवार,राहुल बेदमुथा,सचिव वाहेद भाई,सुशील सदाफुले,ढगे उपस्थित होते