जामखेड तालुक्यात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीवर ‘एलसीबी’ची धडक कारवाई; ५ जणांवर गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीवर ‘एलसीबी’ची धडक कारवाई; ५ जणांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी,

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयित आरोपींसह फरार पुरवठादारांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २८ ऑगस्ट रोजी जामखेड हद्दीतील नान्नज आणि कोल्हेवाडी परिसरात हे छापे टाकले.
जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे व कारवाईचा तपशील:
 नान्नज परिसर: नान्नज येथे कारवाई करून गणेश शिवाजी गोरे (वय २८), विशाल शिवाजी वटाणे (वय २८), वृषभ राजेंद्र पोते (वय २४) आणि योगेश लक्ष्मण मोहोळकर (वय २४) यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चौघांकडून सुगंधी तंबाखू व मावा जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणात माल पुरवणारा आप्पा कुमटकर (रा. राजेगाव, ता. जामखेड) हा फरार घोषित करण्यात आला आहे.
 कोल्हेवाडी परिसर: कोल्हेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात युवराज नारायण कोल्हे (वय ३८) याच्याकडून सुमारे ९७,००० रुपये किमतीचा अवैध गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणात सचिन जाधव (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) हा फरार झाला आहे.
जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि
पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या नेतृत्वाखालील थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष खैरे, शाहीद शेख, संदीप पवार, राहुल द्वारके, प्रशांत राठोड, अरुण गांगुर्डे, भीमराज खर्से, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, दीपक जाधव, गणेश धोत्रे, अमोल कोतकर, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रकाश मांडगे व प्रताप देवकाते यांच्या पथकाने ही कामगिरी केली. एलसीबीच्या पथकाने ही धडक कामगिरी केली.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles