जामखेड सिटी क्लबला सोलापूर येथे दुहेरी बहुमान

*जामखेड सिटी क्लबला सोलापूर येथे दुहेरी बहुमान*

जामखेड | प्रतिनिधी

सोलापूर येथे १९ जुलै २०२६ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चा इन्स्टॉलेशन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी २०२६-२७ या वर्षासाठी रो. जयेश पटेल यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध रोटरी क्लबांचा गौरव करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीने उल्लेखनीय कामगिरी करत ‘सुपर स्टार क्लब’ सुवर्ण पदक तसेच मेंबरशिप पुरस्काराचे सिल्व्हर सन्मानचिन्ह प्राप्त केले. याशिवाय, क्लबचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण यांना ‘कुशल संघटक’ म्हणून सुवर्ण पदक प्रदान करून बडोद्याचे गोस्वामी परमपूज्य १०८ आश्रयकुमार महाराज,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेश पटेल, रो. परुल पटेल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुधीर लातुरे, रो. संगीता लातुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, सचिव अरुण उगले, मार्गदर्शक डॉ. प्रशांत गायकवाड, प्रचार प्रमुख धनराज पवार, कार्यकारी सभासद प्रा. संभाजी मुळे, रो. सुनील उगले, डॉ. भरत देवकर आदी रोटरीयन उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध जिल्ह्यांतील रोटरी क्लब, तसेच जामखेड शहर व तालुक्यातील नागरिकांकडून क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चौकट
—————–
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी यांनी गेल्या वर्षापासून शहरातील सामाजिक विषयावर कार्य हाती घेतले आहे. यामध्ये तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच संगणक संच, वृक्षारोपण तसेच जामखेड येथील स्मशानभूमीत पसायदान फलक व येणाऱ्या काळात जामखेड शहरातील शाळेत डिजिटल क्लासरुम संच व बायो फर्टीलायझर ड्रम असे विविध साहित्याचे वाटपासह वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती क्लब चे अध्यक्ष रोटरीयन डॉ.सादेख पठाण यांनी दिली आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles