२५ जुलैला ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

*२५ जुलैला ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम*

जि.प. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे वितरण

जामखेड प्रतिनिधी :

शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव माननीय श्री.राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार व शिवसेना जामखेड तालुका जामखेड यांच्या वतीने जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेला प्रथमोपचार पेटीचे वाटप आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख मोहन देवकाते यांनी दैनिक महाराष्ट्र सुर्योदय न्यूज शी बोलताना दिली.

जामखेड शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी या प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात येणार आहे.

नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाफना दांम्पत्य व मित्र परिवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत शहरातील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक,आरोग्य व शैक्षणिक कार्यात सहभागी होऊन काम करत आहेत. त्याच अनुषंगाने या प्रथमोपचार पेटीचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पेटीचे अनावरण करण्यात आले.यावेळी तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार डोंगरे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, पांडुरंग माने, विकी पिंपळे, दत्तात्रय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिनांक २५ जुलै रोजी पासून आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात येणार आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles