जामखेडमध्ये ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील विश्वक्रांती चौक, बीड रोड येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’ चा शुभारंभ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे यांनी केले आहे.
रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. हाडांचे आजार, सांधेदुखी, फ्रॅक्चर, मणक्यांचे विकार तसेच इतर अस्थिरोगांवरील उपचारांसह आधुनिक तपासणी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय एम.आर.आय. तपासणीची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास प.पू. पांडुरंग (देवा) देशमुख शास्त्री (सोनगाव) यांचे शुभहस्त लाभणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. प्रा. राम शिंदे (सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आ. सुरेश (आण्णा) धस, मा. आ. रोहित (दादा) पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजलताई अमित चिंतामणी तसेच मा. संजय (काका) कोठारी (अध्यक्ष, कोठारी प्रतिष्ठान, जामखेड) उपस्थित राहणार आहेत.
दवाखान्याचे व्यवस्थापन डॉ. भरत दारकुंडे (ICU Intensivist – Managing Director), डॉ. सोनाली दारकुंडे (ICU Intensivist – Managing Director), डॉ. अजय शिरसागर (M.B.B.S., D. Ortho – हाडांचे तज्ज्ञ) आणि डॉ. वैभव हुंबे (M.B.B.S., M.D. Medicine – फिजिशियन) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे.
जामखेड तालुक्यातील नागरिकांना आधुनिक, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू होत असून, उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
![]()
