जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यास 1 (एक) वर्षाकरीता स्थानबध्द….

रेकॉर्डवरील इतर 10 ते 12 गुंडांना आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने
होणार कारवाई – पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा. भवरवाडी ता.जामखेड यांचे विरोधात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्रा सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगुन खुनाचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन अनुसुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करणे सदर आरोपी विरोधात जामखेड पोलीसांनी एम.पी. डी.ए (स्थानबध्द ) कायदयान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.

आणखी दहा ते बारा गुंडांवर हीच कारवाई थोड्याच दिवसात करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.गैरकायदयाची मंडळी जमवुन खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्नीशस्त्रा सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे विविध कलमान्वये गुन्हे केल्याने जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपीविरोधात जामखेड पोलीसांनी एम. पी. डी. ए (स्थानबध्द) कायदयान्वये पोलीस अधिक्षक अहमदनगर यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे सदर इसम यास स्थानबध्द करणे बाबत प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावांवर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सदर प्रस्तावातील आरोपी नामे- अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा. भवारवाडी ता. जामखेड यास 1 (एक) वर्षाकरीता दि.29/08/2024 रोजी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.तसेच रेकॉर्डवरील इतर 10 ते 12 गुंडांना आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार व एम. पी. डी. ए (स्थानबध्द) प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे पोलीस उपअधिक्षक, अहमदनगर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत, यांचे मार्गदर्शना खाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोहेकॉ बिरप्पा करमल, पोहेकॉ अजय साठे, पो. कॉ. अमोल आजबे, पो. कॉ. सचिन पिरगळ, पोकॉ दिपक बोराटे, पो. कॉ. दत्तु बेलेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *