जातीच्या दाखल्या बरोबरच वंचित घटकांनी इतर शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – डॉ. भगवान मुरूमकर
जामखेड प्रतिनिधी:-
वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाला शासकीय कार्यालयात जातीचे दाखले मिळवण्यासाठी खूप थेटे मारावे लागतात या संस्थेने 500 दाखले वाटप करून समाजात आदर्श निर्माण केला आहे मात्र या समाजाने दाखल्याबरोबरच इतर सर्वच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी व्यक्त केले शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही हीच अडचण ओळखून लक्ष्मी पवार यांच्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील 500 विद्यार्थ्यांना दिनांक 26 जून 2023 रोजी दुपारी जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी जामखेड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, साहित्यिक नामदेव भोसले, मुख्याधिकारी अजय साळवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, बापूसाहेब गायकवाड, अशोक पवार, सावकार भोसले, संचालक नंदू गोरे, विनायक राऊत, सेंचुरी कॉम्प्युटरचे संचालक विजय काळदाते, प्रा. विकी गायकवाड, राजेंद्र काळे, जयेश कांबळे, अॅड. मोहन कारंडे, साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीराताई तंटक, संचालक संतोष पिंपळे, वंचित बहुजन आघाडीचे आतिश पारवे, ओम शांती सेंटरच्या भारती दिदी, जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मीबाई पवार, रुकसाना पठाण, जयश्री पवार, निशा पवार, दुर्गा पवार, बाबासाहेब फुलमाळी सह अनेक मान्यवर उपस्थित होते
पुढे मार्गदर्शन करताना डॉ. भगवान मुरुमकर म्हणाले की जातीचे दाखले काढताना वंचित समाजाला मोठे कसरत करावी लागते मात्र या संस्थेने 500 दाखले काढले व याला प्रशासनाने देखील मदत केली चांगले अधिकारी असले की कामे होतात राहतात अधिकारी वर्गाने देखील अशा लोकांना शासकीय कार्यालयात सहकार्य करावे जातीच्या दाखल्याबरोबरच अनेक योजना आहेत त्याचा देखील लाभ घ्यावा असे म्हणून डॉ . भगवान मुरुमकर यांनी आव्हान केले.
यानंतर साहित्यिक नामदेव भोसले यांनी सांगितले की आज पर्यंत हा गोरगरीब समाज कायम शासकीय योजना पासून वंचित राहिला आहे कायम संस्थेच्या नजरेने पारधी समाजाकडे पाहिले जाते हा दृष्टिकोनात प्रत्येकाने बदलला पाहिजे तसेच गरिबांच्या दुख समजून त्यांना प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पारधी समाजाकडे आजही गुन्हेगार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी भटके विमुक्त वंचित घटकाला मुख्य प्रवास आणण्याचे काम केले आहे पार दिवस आदिवासी समाजाने आपल्या मुलांना शिकवा व मोठे अधिकारी बनवा त्याशिवाय आपल्यावर लाभलेला शिका पुसणार नाही पंचायत समितीच्या वतीने वंचित समाजाला जी मदत लागेल ते केली जाईल असे सांगितले.
त्यानंतर नगरसेवक अमित चिंतामणी, मुख्याधिकारी अजय साळवे, सभापती शरद कार्ले ,राजेंद्र काळे नगर, भारती दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गर्जे यांनी केले तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता ळे यांनी मांडले शेवटी भारताचे संविधान वाचून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.