आमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहिले पाहीजे : पोलीस निरीक्षक महेश पाटील
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने ल.ना. होशिंग विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आमली पदार्थांची नशा केल्यामुळे आपल्यासह आपल्या परिवाराचेही जीवन उद्ध्वस्त होते. यामुळे आमली पदार्थांच्या व्यसनापासून दुर राहण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. याबरोबरच सामाजिक व महिला सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सुचनांचे पालनही नागरिकांनी करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
याचबरोबर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काही सूचना दिल्या
नशा मुक्ती, अंमली पदार्थाचा वापर टाळणे.
सोशल मीडियावरील अनावश्यक बाबी प्रसारित न करणे.
कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये.
मुलींना काही अडीअडचणी असल्यास अर्जद्वारे कळवावे.
सर्वांनी काही असल्यास डायल 112 चा वापर करावा
अश्या विविध सूचना देत पोलीस कामकाजाविषयी माहिती सांगून अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात केले
यावेळी ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य
श्रीकांत होशिंग, प्रा. अनिल देढे, पारखे सर , प्रवीण गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमावेळी विद्यालयातील विध्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थितत होते.