*जवळा येथील रा. मा – ५६ (जवळा फाटा)ते मारुती मंदीर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भूमिगत गटार व्हावी – खा. सुजय विखेंना जवळा ग्रामस्थांची मागणी*
जामखेड प्रतिनिधी,
हाळगाव येथे खा. सुजय (दादा) विखे पाटील यांना जवळा गावच्या विविध प्रश्नांवर निवेदने देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने जवळा फाटा (रा. मा ५६) ते मारुती मंदीर या रस्त्याच्या दोन्हीं बाजूंनी भूमिगत गटार योजना मंजूर करावी ही मागणी करण्यात आली.
जवळा फाटा ते मारुती मंदिर या रस्त्याने दोन्ही बाजूंना सांडपाणी सोडण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाणी व गटारीचे पाणी रस्त्यावर सोडले जात असून दुर्गंधीचा मोठा सामना या परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे. मागील काळात या दुर्गंधीमुळे साथीच्या रोगांचा मोठा फटका या परिसरातील लोकांना बसला होता.
आज हाळगाव येथे खासदार सुजय विखे पाटील आले असता त्यांना वरील विषय मांडून जवळा येथील रामा 56 ते मारुती मंदिर इथपर्यंत दोन्ही बाजूने भूमिगत गटार लवकरात लवकर मंजूर करावी अश्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते अशोक पठाडे, ग्रा.पं.सदस्य प्रशांत पाटील, ज्योती क्रांतीचे दशरथ हजारे सर, डॉ . दिपक वाळुंजकर, माजी उपसरपंच गौतम कोल्हे, इंजिनीयर तुषार काढणे, किसन राउत डॉक्टर,भाजपचे पदाधिकारी मास्टर हबीब शेख, प्रगतशिल शेतकरी राजेंद्र महाजन,बाळासाहेब कथले हे उपस्थित होते.