राष्ट्रीय महामार्गाच्या कामा मध्ये जो कोणी
आडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केले जाणार नाही – खासदार सुजय विखे….

खासदार सुजय विखे यांनी दिले मुख्याधिकारी अजय साळवे यांना अतिक्रमण धारकांना नोटीस काढण्याचे आदेश !

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे आंतर कमी होणार नाही. रस्त्याच्या कामात अधिकारी व ठेकेदार यांनी हलगर्जीपणा करु नये, रस्त्याचे काम सुरू असताना जो कोणी अडथळा निर्माण करत असतील तर त्यांच्यावर ३५३ चे गुन्हे दाखल करा असे आदेश खा.सुजय विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.जामखेड येथे दि १० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कामा संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी रस्त्याबाबत आडचणी मांडताना सांगितले की उरलेला रस्ता एकाबाजुने जे रस्त्याचे काम सुरू आहे ते वेगाने व्हावे तसेच दुसर्‍या बाजुने रस्ता वहातुकीस व्यवस्थित करण्यात यावा ,चांगल्या दर्जाचा मुरुम टाकावा, रस्त्यावर व नाली बांधकामावर जास्त प्रमाणात पाणी मारावे आशा सुचना दिल्या. पुढे बोलताना खा. सुजय विखे पाटील म्हणाले की शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रत्यावर येणारी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील कोणाचीही गय केली जाणार नाही .काही अडचण आल्यावर फोन लावा रस्त्याच्या कामाला कोणी आडवे आले तर गुन्हे दाखल करा कोण दादागिरी करतय त्याला जशास तसे उत्तर दया थोडा फार त्रास होणार आहे. अडचण आल्यावर पोलीस प्रशासनाची मदत घ्या.
यावेळी राष्ट्रवादीचे दत्तात्रय वारे म्हणाले की, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे तरी ठेकेदाराने एका बाजूनी व्यवस्थित बॅरिकेट लावून वाहतूक कशी सुरळीत होईल अशा पद्धतीने मुरमाचा रस्ता तयार करावा व शक्यतो शहरातील रस्त्याचे काम रात्रीच्या वेळेत करावे रस्त्याच्या कडेला लागणारे वाहने ट्राफिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले की एस टी स्टॅन्ड व बँक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तेथील रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे यांचबरोबर रस्ता दर्जेदार व्हावा ठेकेदार यांनी शक्यतो रात्रीच शहरातील काम करावे असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले की बीड रोडवरील रस्त्याचे काम चालू आहे परंतु एक साईट काही प्रमाणात झाली आहे परंतु खाली वर वाहन धारकांना उतरावे लागत आहे तेथे आणखी थोडे फार ब्रॅकेट लावले तर लांबूनच कोणत्या साइटला वळलायचे आहे ते कळेल व लवकर रस्त्याचे काम होईल याकडे ठेकेदाराने लक्ष द्यावे व रस्ता लवकरात लवकर करावा असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे , महावितरण कंपनीचे अभियंता शरद चेचर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मुख्याधिकारी अजय साळवे,बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रा. मधुकर (आबा) राळेभात , जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, दत्तात्रय वारे, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, माजी सभापती सुधिर राळेभात, उपसभापती कैलास वराट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे,अडव्होकेट बंकटराव बारवकर,नगरसेवक अमित चिंतामणी, बिबीशन धनवडे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, विकास राळेभात, निखिल घायतडक , अंकुश ढवळे, अमित जाधव, सलीमभाई तांबोळी, तुषार बोथरा सह राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *