*२०२४-२०२५ सालच्या जिल्हा बँकेच्या वाढीव कर्ज मागणीच्या पाठपुराव्यासाठी नेमलेल्या तज्ञ कमीटीस यश
*जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या वतीने तज्ञ कमीटीच्या सदस्यांचा सन्मान*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील तज्ञ कमिटी सदस्यांनी नगर येथे झालेल्या सभेमध्ये २०२४-२०२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना केली कर्जाच्या रकमेचे स्केल वाढविण्याची मागणी या मागणीला बँकेच्या पदाधिकारी – व्यवस्थापनानेही दिला दुजोरा, तदनंतर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व करण ससाणे यांनी जामखेडच्या तज्ञ कमिटी सदस्यांचे कौतुक करून त्यांचा बँकेच्या सभागृहात सन्मान केला.
जामखेड तालुक्यातून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०२४-२०२५ सालचे पीक कर्जविषयक धोरण ठरविण्यासाठी संचालक अमोल राळेभात यांनी तीन तज्ञ समिति सदस्यांची नियुक्ती केली होती. यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर दादा राळेभात, सोसायटी चेअरमन शहाजी पाटील, वंजारवाडी तरडगाव माजी सरपंच तथा पत्रकार वसंत सानप यांचा समावेश केला होता.
तज्ञ समिती गठित केल्यानंतर शुक्रवार २९ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, मुख्यव्यवस्थापक रावसाहेब वर्पे, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, संचालक भानुदास मुरकुटे, संचालक सीताराम गायकर, संचालक अमोल राळेभात, संचालक करण ससाणे, संचालक काकासाहेब तापकिर, संचालिका अनुराधाताई नागवडे आदिसह बँकेचे विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जामखेड येथील तज्ञ समिति सदस्य सुधीर दादा राळेभात व वसंत सानप यांनी चर्चेत सहभाग घेवून २०२४-२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना खरीप- भुसार, पशुपालन, पक्षीपालन व मत्स्यव्यवसाय करिता खेळते भांडवल उपलब्ध करून देताना मागील वर्षापेक्षा वाढीव स्केल द्यावे अशी मागणी केली.
या मागणीला बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेवून मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवण्याची ग्वाही दिली.