खर्डा सोनेगाव नान्नज या नवीन रस्त्याच्या रस्त्याची मा. मंत्री आमदार राम शिंदे यांच्याकडून पाहणी,
आ राम शिंदे यांनी कामाबाबत समाधान व्यक्त,करत रस्त्याचा दर्जा चांगला करण्याच्या दिल्या सूचना…
जामखेड प्रतिनिधी,
याबाबत माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्डा, सोनेगाव ते नान्नज रस्त्याचे काम मंजूर झाले आहे.
यामधील सध्या सोनेगाव ते खर्डा या रस्त्याच्या कामासाठी नऊ कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची रस्त्याची परवड संपणार आहे.
दिनांक 27 डिसेंबर रोजी माजी मंत्री आमदार राम शिंदे साहेब हे तरडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता काल्याच्या कीर्तनास भेट देण्याकरिता आले असता, त्यांनी सोनेगाव खर्डा या रस्त्याच्या कामाची पाहणी केली याबाबत त्यांनी रस्त्याची माहिती घेत असताना यामध्ये एकूण दहा किलोमीटरच्या रस्ता आहे.
साडेपाच मीटर रुंदी असलेला या रस्त्यामध्ये दोन मीटरच्या साईट पट्ट्या आहेत त्यामुळे हा रस्ता मोठा होणार असून त्याचबरोबर सोनेगाव सातेफळ व खर्डा या गावाच्या जवळ 200 मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता होणार असून असा एकूण सहाशे मीटर सिमेंट रस्ता गावाच्या लगत होणार आहे. या सर्व कामाची माहिती आमदार शिंदे यांनी घेतली व सुरू असलेल्या कामाचा दर्जा पाहून समाधान व्यक्त केले.
अनेक वर्षापासून खराब असलेला व रखडलेल्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हा रस्ता एक वर्षापर्यंत पूर्ण करणार असल्याचे ठेकेदार देवकर यांनी आवाज जामखेडचा शी बोलताना सांगितले.
याप्रंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन सर गायवळ, मा.उपसभापती तुषार पवार,सोनेगावचे सरपंच डॉ.विशाल वायकर, तरडगाव दौंडवाडी वंजारवाडी गावचे सरपंच डॉक्टर जयराम खोत, उपसरपंच विक्रम पवार, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जावळे, शिवाजी ढाळे, रेवन सांगळे, बबन दौंड ,भास्कर मुंडे
महेश बांगर, रामा खोत, संभाजी कराड, परमेश्वर ढाळे अमोल ढाळे संतोष ढाळे, नामदेव ढाळे, ज्ञानेश्वर खोत, संजय जावळे, दत्ता ढाळे बापू मुंडे सिताराम खोत इत्यादी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.