पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जामखेड चा शौर्य विकास हजारे जिल्ह्यात प्रथम…!!

जामखेड :-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन 2024 साठी घेण्यात आलेल्या राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून जि. प.प्राथ.शाळा हाळगाव ता.जामखेड येथील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी चि.शौर्य विकास हजारे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या परीक्षेस जिल्ह्यातील एकूण 11099 विद्यार्थी बसले होते.यामधून चि.शौर्य हजारे याने 298 पैकी 288 गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. जामखेड सारख्या ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थ्याने मिळविलेले हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.

या परीक्षेत जामखेड तालुक्यातील एकूण 148 विद्यार्थी पात्र ठरले असून 260 गुणांच्या पुढे जिल्ह्यातील एकूण 6 विद्यार्थी असून यापैकी 2 विद्यार्थी हे जामखेड चे आहेत.तसेच जिल्ह्यातून 280 गुणांच्या पुढे शौर्य हा एकमेव विद्यार्थी आहे हे विशेष.


जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी तालुक्याचा चार्ज स्वीकारल्यापासून शालेय गुणवत्तेचा आलेख नेहमी चढता राहिलेला आहे. शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन व त्यांच्या कामावर दाखविलेला विश्वास यामुळे जामखेड तालुका दिवसेंदिवस शालेय गुणवत्ता विकास बाबतीत अग्रेसर होताना दिसत आहे.

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी शौर्य हजारे, जि. प.शाळा हाळगाव येथील सर्व शिक्षक स्टाफ तसेच तालुक्यातील इतर सर्व पात्र विद्यार्थी त्यांचे शिक्षक ,मुख्याध्यापक,पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर,शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भास्कर पाटील, गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे ,सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,साधन व्यक्ती ,मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *