मतदान करा अन् शितल कलेक्शनच्या खरेदीकर मिळावा ५ टक्के सवलत
जामखेड प्रतिनिधी,
लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था मतदारांना प्रोत्साहित करत आहेत. याच अनुषंगाने लोकसभेच्या १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जो मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावेल त्या मतदारांसाठी जामखेड शहरातील नावाजलेल्या शितल कलेक्शन मध्ये खरेदीवर तीन दिवस पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी दिली आहे.
जामखेड येथील शितल कलेक्शन हे वेळोवेळी ग्राहकांसाठी खरेदीवर विविध आकर्षक योजना राबवत आसते याच अनुषंगाने आपला हक्क आपला अधिकार, बनुया जागरुक आणि सुजाण मतदार या घोषवाक्या प्रमाणे मतदान करणे आणि मतदानाच्या सहाय्याने योग्य तो उमेदवार निवडणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपल्या उज्वल भवितव्यासाठी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन जामखेड च्या शितल कलेक्शन च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी व प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा या प्रमुख उद्देशाने जामखेड येथील प्रसिद्ध आसलेल्या शितल कलेक्शनच्या वतीने मतदारांसाठी खास ॲफर आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये जो मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावेल व मतदान करुन आल्यावर शितल कलेक्शन या दालनात १३,१४, १५ मे २०२४ पर्यंत कपडे खरेदी करेल त्या मतदाराने मतदान केलेल्या आपल्या बोटाची शाई लावलेली खुन दाखवली तर शितल कलेक्शन येथील कपड्याच्या खरेदीवर त्या मतदारास पाच टक्के सवलत मिळणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावुन शितल कलेक्शन येथे खरेदीवर पाच टक्के सवलत मिळवावी आसे अवहान शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.