रामभाऊ शिंदे मी तुमच्यासाठी बेरर चेक आहे सही केली आहे तुम्ही फक्त किमंत टाका-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

जामखेड । प्रतिनिधी

नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागाकरिता सुरू असलेले जल सिंचणाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करूण देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जामखेड येथे महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड, बाजार तळ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार सुरेशअण्णा धस, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,रामभाऊ मी तुमच्यासाठी बेरर चेक आहे तुम्ही अमाऊंट ठरवाची आणि टाकायची आहे मी अगोदरच चेक वर सही केली आहे. पुन्हा एकदा आ राम शिंदे हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या खूप जवळचे नेते आहेत हे ही यावेळी उपमुख्यमंत्री यांनी जामखेड करांना व नेत्यांना दाखवून दिले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की,ही निवडणूक गल्लीतील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला कोण विकासाकडे नेवू शकतो. आणि सामान्य मानसाच्या आशा आकांक्षा पुर्ण करू शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे. यामुळे पंतप्रधान पदांची संगीत खुर्ची खेळणाऱ्यांच्या मागे जावू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत देशाला विकासात पुढे आणले आहे. यामुळे डॉ. सुजय विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत ही जाणीव ठेवा असा सल्ला दिला.

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोंदीच्या मार्फत झालेल्या कामांचा उवापोह करत इंडी आघाडीचा सडेतोड समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, मोदींकडे विकासाची गाडी असून त्यात महायुतीच्या पक्षांचे डबे आहेत आणि त्यात सर्व सामान्य जनतेला जागा आहे. तर इंडीकडे केवळ इंजिन आहेत आणि इंजिनमध्ये कुणाला जागा नाही.

कॉंग्रेसच्या काळात ऊस शेतकऱ्यांवर १० हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स होता. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी कायदा बदलून हा टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याच बरोबर मोदी सरकार च्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासाची भरगोस कामे केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारचा दुष्काळ कमी करण्यासाठी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. येणाऱ्या काळात सुजय विखेंच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा दुष्काळ आपल्याला संपवायचा आहे. यामुळे येत्या १३ तारखेला कमळ चिन्हाचे बटण दाबून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार सुरेश अण्णा धस, आमदार राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, चित्राताई वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *