*सतेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश भागवत तोंडे तर उपाध्यक्ष सोमिनाथ नागरगोजे यांची बिनविरोध निवड*
जामखेड प्रतिनिधी,
जिल्हा परिषद शाळा सतेवाडी (नायगाव)हि ग्रामीण भागातील 2 शिक्षकीय असलेली शाळा पटसंख्या अवघी 30 परंतु शाळा सुधारली पाहिजे विध्यार्थी घडले पाहिजेत यासाठीच हि निवड केली जाते या समितीवर अध्यक्ष म्हणून गणेश भागवत तोंडे तर उपाध्यक्ष पदी सोमनाथ नागरगोजे यांची पालकांनी बिनविरोध निवड केली आहे.
यावेळी शुभेच्छा देताना माजी सरपंच गणेश तोंडे म्हणाले की,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेवाडी (नायगाव ) या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज राज्यातील विविध ठिकाणी पोलीस, महसूल, शिक्षण, डॉक्टर, बँक, उद्योजक व व्यवसाय या क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असून चांगल्या प्रकारे काम करत आहेत.
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी असताना गावातील शाळेचा नावलौकिक तालुक्यात व्हावा, यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची व उपाध्यक्ष ची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल.
विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी हे अध्यक्ष नक्कीच पोहोचतील व पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करतील असा विश्वास आम्हाला आहे. व काहीही शाळेला मदत लागली तर मी सैदेव आपल्या सोबत आहे
यावेळी त्यांचा सत्कार करताना माजी उपसरपंच मा. गणेश तोंडे समवेत दत्ता तोंडे, भोसले सर,
राजीव मडके सर,हरिदास तोंडे, निलेश तोंडे, भगवान तोंडे व गावातील नागरीक उपस्थित होते.
![]()