*जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने ४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…*

” मी रक्तदान करतो, तुम्हीही रक्तदान करा – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी,

२६/११ मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ

तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती, भारत राष्ट्राप्रती प्रेमाची आणि त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


आजच्या काळात विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी, नेहमीच रक्ताची कमतरता भासते. २६/११ मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली आहे.

स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या मनात ही असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ४ डिसेंबर २०२३ वार सोमवार रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारी व्यक्तींना रक्ताची गरज असून कोणत्याही माणसाला रक्ताची उणीव भासू नये . यामुळे “मी रक्तदान करणार, तुम्हीही रक्तदान करा. असे आवाहन यावेळी त्यांनी रक्तदात्यांना केले आहे.

जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक,व्यापारी, मेडिकल संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर व तरूणांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *