प्रतिनिधी(जामखेड):
दि.१५ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे इयत्ता पहिलीच्या च्या दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व प्रवेशोत्सव उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.यावेळी इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये बैल गाडीतून व घोड्यावर बसून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नविन मुलांची मिरवणूक गावामधून काढण्यात आली.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व पालक सहभागी झाले होते.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील सर्व विद्यार्थांना स्वादिष्ट व रुचकर गोड जेवण देण्यात आले.तसेच जिल्हाअंतर्गत बदलीने सारोळा शाळेत नव्याने हजर झालेले श्री.शहाजी जगताप सर,श्री.माजिद शेख सर व श्रीम.शबाना शेख मॅडम यांचे शाळेच्या व गावच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावचे सरपंच श्री.अजयदादा काशिद,माजी सरपंच श्री.हरिभाऊ खवळे,ग्रामपंचायत सदस्य श्री.किरण मुळे, श्री.बापूराव तांबे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.किशोर सातपुते,SMC माजी उपाध्यक्ष श्री.देविदास पवार,शाळेतील शिक्षक श्री.सोळंके सर,श्री.होळकर सर,श्रीम.रसाळ मॅडम,सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री धनवे साहेब यांचे सूचनांप्रमाणे घेण्यात आला.