जिल्हाधिकारी यांनी 100 डेज कॅम्पिंग चे केले कौतुक..

अरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधत काम समाधानकारक असल्याचे केले नमुद..

जामखेड प्रतिनिधी.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरणगाव खर्डा, नान्नज हाळगाव व जामखेड येथे शासकीय एक्स-रे व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली व क्षयरोग निदानासाठी एक्स-रे करण्यात आले. त्याची पाहणी माननीय जिल्हाधिकारी यांनी केली व समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जामखेड विभागाचे क्षयरोग निर्मूलनाचे काम चांगले असल्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.

१०० दिवसात टी. बी. मुक्त राज्य सरकारचे उद्दिष्ट आसल्याने दि ७/१२/२०२४ ते दि. १७/३/२०२५ या कालावधीत रूग्णांना लवकरात लवकर उपचार मिळुन शुन्य टक्के मृत्यू दर या उद्देशाने सध्या उपचार सुरू आहेत.
याच आनुसंघाने जामखेड शहरात काल दि. १७/१/२०२४ रोजी हाय रिस्क लोकसंख्याची तपासणी डायबेटिस लोकसंख्या,६० वर्षा वरील टीबी, पेशंट व त्यांच्या सानिध्यातील सदस्य तसेच धुम्रपान
करणारे लोक यांची. तपासनी करून संशयित रुग्णांचे Truenut करून त्यामधील 1 a Chest X-ray करूण घेतले जात आहेत.
काल पर्यंत १२७२० लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये ४३६ Truenut, तपासणी तर ४५० एक्सरे करण्यात आले १८ रूग्णांना उपचार देण्यात आले आसुन सर्व संशयित रुग्णांचे एक्स-रे मोफत करण्यात आले आसल्याचे तालुका अरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ, तालुका आरोग्य आधिकारी डॉ.
सुनिल बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामदास मोराळे, डॉ डोंगरे, अरुण घुंगरट, दादा खाडे, मजहर खान, सुपरवायजर डोळे, सर्व आशा स्वयंसेविका ANM उपस्थित होते
तसेच या विशेष मोहिमेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, एस टी एल एस अरुण घुंगरड एसटीएस दादा खाडे हे तालुकास्तरीय डी एम सी क्षयरोग जामखेड येथे ट्यूबर्क्युलस युनिटवर विशेष कामकाज करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *