पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जामखेड शहर व तालुक्यात माजी उपसभापती अंकुश ढवळे यांचे एकमेव झळकवले बॅनर…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जामखेड शहर व तालुक्यात माजी उपसभापती अंकुश ढवळे यांचे एकमेव झळकवले बॅनर…

उपसभापती अंकुश ढवळे यांनी जामखेड शहर व तालुक्यात बॅनर झळकावून निष्ठावंत दाखवून दिले

जामखेड प्रतिनिधी –

जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जामखेड तालुक्यातील एकमेव कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे पाटील यांनी विखे पाटील कॅबिनेट मंत्री व अहिल्यानगर पालकमंत्री झाल्यानंतर जामखेड शहर व तालुक्यात बॅनर झळकावून निष्ठा दाखवून दिली आहे. त्यांनी मकरसंक्रांत सणानिमित्त मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना तिळगूळ व गुळाची ढेप वाटप करून तालुक्यातील कार्यकर्त्यांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जामखेड तालुक्यातून स्वागत होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अंकुशराव ढवळे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे तालुक्यातून एकमेव कट्टर समर्थक आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघ पिंजून काढला होता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून दिला त्या लाभार्थ्यांना वैयक्तिक भेटून मतदान घडवून आणले होते. निवडणूक असो वा नसो ते सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होऊन नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीची माहीती देत असतात.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागताच जामखेड शहर व तालुक्यात तोफा व फटाके वाजवून जोरदार जल्लोष साजरा केला होता व सर्वत्र बॅनरबाजी केली होती. त्याचप्रमाणे आत्ता नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री होताच जामखेड शहर व तालुक्यात बॅनरबाजी केली. सदर बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे संचालक अंकुशराव ढवळे पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटात वारंवार होणारा खंडीत विजपुरवठा व कमी दाबामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले होते.

त्यावेळी ढवळे यांनी तत्कालीन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सदर बाब लक्षात आणून दिली व त्यांनी तात्काळ अठरा ते वीस गावात रोहीत्र मंजूर करून महावितरण मार्फत बसवण्याचे काम केले. सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page