*आता JIO FIBER जामखेड शहरात सुरु, टीव्ही बरोबरच इंटरनेट सुविधा*
जामखेड प्रतिनिधी,
विश्वदर्शन केबल टीव्हीच्या माध्यमातून आता शहरात जिओ फायबर सेवा सुरु करण्यात आली असून याचे उदघाटन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.
यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की, जामखेड शहरात हायस्पीड इंटरनेट सेवेची गरज होती, नागरिकांना व व्यापाऱ्यांना या माध्यमातून मोठी मदत होणार आहे. आणि आज इंटरनेट सेवा ही खूप गरज बनली असून ती विश्वदर्शन केबलच्या मध्यंमातून पूर्ण होत आहे त्यांना शुभेच्छा.
यावेळी बोलताना विश्वादर्शन केबल टीव्हीचे संचालक गुलाब जांभळे म्हणाले की आम्ही पंचवीस वर्षांपासून केबल टीव्ही माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहोत आता जिओ च्या माध्यमातून टीव्ही बरोबरच इंटरनेट सेवा देखील पुरवणार आहोत तेव्हा या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिओचे विजय गोसावी साहेब, डॉ सुरेश काशीद, विश्वादर्शनचे गुलाब जांभळे, पोपट नाना राळेभात, बंडू म्हेत्रे, डॉ. ओम जांभळे,पत्रकार नासिर पठाण, मोहहीदिन तांबोळी,किरण रेडे अशोक वीर, संजय वारभोग, अविनाश बोधले,पप्पू सय्यद,अजय अवसरे,अरुण हिंगणे,अनिल म्हेत्रे, आदित्य जांभळे प्रदीप महारनवर, तेजस सातपुते, सुमित ओहोळ सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आभार व्यक्त करताना पोपट नाना राळेभात म्हणाले या जिओ च्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना इंटरनेट बरोबरच टीव्ही सेवा व फोन सेवा देखील देणार आहोत ते पण 4k क्वालिटी याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा व सर्वांचे आभार….
यामध्ये मासिक प्लॅन तीन माही प्लॅन, सिक्स मंथ प्लॅन असणार आहे व यांचबरोबर इंटरनेटला 30 mbps पासून 500 mabps स्पीड असणार आहे व 500+ 4 k HD चॅनल ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत.