*मा.श्री.सुधीर दादा राळेभात यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार*

जामखेड प्रतिनिधी.

जामखेड तालुक्यातील शिउर या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था अहमदनगर व्यवस्थापक समिति सदस्यपदी निवड झालेबद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर दादा राळेभात यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी विजयी उमेदवार श्री.सुधीर दादा राळेभात यांची शिउर गावातून मिरवणूक काढण्यात येवून शिउर गावचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. विठ्ठल चव्हाण हे होते.

तसेच यावेळी सिद्धेश्वर लटके, अप्पासाहेब निकम, विश्वासराव पाटील, अंगद देवकाते, भगवान वाघमारे, गणेश निकम, भुजंग निकम, भास्कर तनपूरे, सचिव भाऊसाहेब तनपुरे, दत्तात्रय वीर, कचरू वीर, अप्पा अनभूले, शिवाजी लटके, नवनाथ काळे, महादेव लटके, दादा निकम, महादेव गायकवाड, बबन देवकाते, संतोष काळे, विठ्ठल देवकाते, नाना देवकाते, परमेश्वर समुद्र, गौतम काळे,दत्ता काळे, नामदेव तनपूरे, दिलीप तनपूरे, भिकु समुद्र, भास्कर काळे, गणेश बागले, शिंदे गजानन आदिसह शिउर गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुधीर दादा राळेभात यांनी यथोचित सन्मान केल्याबद्दल शिउर ग्रामस्थांचे आभार मानले तसेच या निवडणुकीत मला मतदान करून जो काही विश्वास ठेवला आहे तो नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन.

तसेच माझे वडील स्वर्गीय तात्या हे सलग ४० वर्ष राजकारणामध्ये होते. त्यामुळे लहानपणापासूनच २५ वर्षे त्यांच्याबरोबर सहकार क्षेत्राचा अगदी जवळून अनुभव घेतला आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर आम्ही दोघे भाऊ यशस्वीपणे सहकारात काम करीत असून येथून पुढेही असेच काम करीत राहू, अशी ग्वाही सुधीर दादा यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. विठ्ठल चव्हाण यांनी सुधीर दादा राळेभात यांना शुभेच्छा देवून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *