कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ साजरा.
आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे नक्की ठरवुन त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येते-प्राचार्य प्रशांत जोशी
आत्मबलाने समृद्ध होऊन, आत्मविश्वासाच्या गरुडपंखांमध्ये बल भरुन ,आकाशी उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झालेल्या विध्यार्थ्यांनाचा निरोप समारंभ संपन्न.
जामखेड प्रतिनिधी,
कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ साजरा झाला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस इयत्ता दहावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी जोरदार स्वागत केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी इयत्ता दहावीच्या वर्गाने भेट दिलेल्या रोपाचे रोप वाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.हे झाड म्हणजे त्यांनी रोवलेल्या आठवणी.
त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन केले. यातुन त्यांनी या शाळेत शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच या प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागेल भरा-या मारू,नवे जग,नवी आशा, शोध घेण्याची जबर मानशा,याच शाळेने लावले वळन,त्यावर चढऊ यशाची चढण.आशा शब्दात आपला आत्मविश्वास प्रकट केला. तर,भव्य दिव्य शिखरे जरी आम्ही गाठली तरी ख-या अर्थाने तुच आमची जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे ,आमच्या पंखांना बळ देऊन आमचा केला प्रतिपाळ ,हि अशी आमची शाळा. या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी कालिका पोदार स्कूलचे संस्थापक श्री श्री निलेश तवटे आणि श्री सागर अंदूरे तसेच प्राचार्य श्री प्रशांत जोशी ,सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभाशीर्वाद दिले.
आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे नक्की ठरवुन त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येईल. एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे. कि आता केवळ गुणवत्ता हा निकष महत्वाचा राहिलेला नाही, तर एकंदरीत व्यक्तीमत्व अवांतर वाचन संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण समयसुचकता इत्यादी गोष्टीही महत्वपुर्ण ठरतात.त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो कारण ती काळाची गरज आहे. अशाच त-हेने शाळेने दिलेले आचार विचार केलेले संस्कार देऊ केलेली सकारात्मक दृष्टी जीवणालासामोरे जाण्याची
प्रेरणा अशी समृद्ध शिदोरी घेऊन इथला प्रत्येक विद्यार्थी आकाशाला गवसणी घालण्यासाठी सुसज्ज आहे. त्यांना पुढील यशस्वी आयुष्याबद्दल शुभकामना असे मौलिक विचार शाळेच्या प्राचार्यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणातून व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला .व सर्व विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेण्यासाठी प्रयाण केले.