*कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*

*पालकांनी आपल्या पाल्याला टी.व्हि. मोबाईल, लॅपटॉप, आणि मिडीया पासून दुर ठेवा.तरच ते यशस्वी होतील-बी.ए.मैंदुर्गे सर*

जामखेड प्रतिनिधी,

‘‘विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे आई वडिलांनंतर शिक्षकच करत असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड नेहमीच करत असते,या शाळेत शिकणारा विद्यार्थी एक ना एक दिवस नक्किच आकाशाला गवसनी घालण्यासाठी सज्ज असेल कारण या विद्यार्थ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास तसेच आपल्या मुलांमध्ये उच्य स्वप्न रूजवायची आसतील तर त्यांना टी.व्हि. मोबाईल, लॅपटॉप, आणि मिडीया पासून दुर ठेवा.तरच ते यशस्वी होतील’’ असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी.ए.मैंदुर्गे सर यांनी बोलताना व्यक्त केले.

कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड मध्ये शुक्रवारी 27 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या मध्ये दरवर्षी नवीन विषय घेऊन विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या मनापर्यंत नवसंस्कार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो,तसाच एक विषय आपल्या संस्कृतीची ओळख करुन देणारा ‘कृष्ण कथाऐ’ घेण्यात आला होता.

यावेळी सरस्वती पूजन प्रमुख पाहुणे बी.ए.मैंदुर्गे सर डायरेक्टर-संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल ,लातूर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.उमाकांतजी अंदुरे,उपाध्यक्ष मा.श्री.नितीन तवटे सचिव मा.श्री.प्रशांत कानडे व सदस्य मा.श्री.सागर अंदुरे, मा.श्री.निलेश तवटे, तसेच मा.श्री.विजय झांजड सहायक पोलिस निरीक्षक खर्डा पोलिस स्टेशन,मा.श्री.माधव नगराळे सर, मा.श्री.सुदर्शन चव्हाण सर,मा.श्री.अजय काशीद यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री प्रशांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले . यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये वर्ष 2023-24 वर्ग १० वी ची पहिली बॅच चे सीबीएसई मधून चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कु.सबुरी भंडारी, चि.शिवम अंदुरे, कु.प्रियल बोथरा,चि.ओम् गर्जे,कु.वृशाली जाधवर,चि.रय्यान मकरानी,कु.अश्विनी ताथेड,चि.आदेश ढेकाळे ,चि.सक्षम अष्टेकर

2024-25 या वर्षामध्ये शंभर टक्के उपस्थित विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.त्यानंतर वेगवेगळ्या खेळात व विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच शाळेसाठी समर्पित शिक्षक व कर्मचाऱ्यांना ही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यानंतर वार्षिक अहवाल शाळेची हेडगर्ल कु.जान्हवी सुर्यवंशी, हेडबॉय चि.अभिनव काकडे,अक्वा हाऊस कॅप्टन कु.करीश्मा नेमाने,आणि टेरा हाऊस कॅप्टन कु.सायली कुमटकर यांनी सादर केला. यामध्ये क्रिडा, चित्रकला,अभ्यास,त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेत कोण-कोणते उपक्रम राबविले जातात, त्यासाठी शिक्षकांच्या कार्याचा तपशील. त्याच्यासाठी राबविण्यात आलेली कौशल्य विकास शाळा याबाबत ही माहिती देण्यात आली.

यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली आणि सर्व वातावरण कृष्णमय झाले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री कृष्ण स्तवनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांनी अर्थात निवेदन, नाट्य अभिनय ,नृत्य या गुणदर्शनाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.सर्वजन कृष्ण लीलेत तल्लीन झाले होते.विद्यार्थ्यांनी कृष्णप्रेम,बंधुप्रेम, मित्रप्रेम, भक्ती,ज्ञान यांचा मिलापच घडवून आणला होता.
अशा या भक्तीमय कार्यक्रमाचा शेवट हा पसायदान म्हणून झाला.
यावेळी कार्यक्रमासाठी जामखेड करांची व पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *