उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी वजनकाट्याची मोडतोड करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल का केली नाही – मा. सभापती सुधीर राळेभात
बाजार समितीत अनागोंदी कारभार
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठ्या थाटामाटात मागील आठवड्यात ऐंशी मेट्रिक टन वजन काट्याचे उद्घाटन केले मात्र सभापती व सचिव यांनी नुकसान करणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार का दाखल केली नाही असा सवाल माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात यांनी उपस्थित केला आहे.
सध्या बाजार समितीत अनागोंदी कारभार सुरू आहे. असे राळेभात यांनी सांगितले ते म्हणाले की मी सभापती व सचिव यांना अनेक बाबतीत विचारणा केली पण ते उत्तर देत नाहीत. पारदर्शक कारभार नाही असेही सांगितले. तसेच नुकसान करणाऱ्या विरोधात तक्रार करण्याची सभापती व सचिव यांच्यात हिंमत नाही का❓
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्याच आठवड्यात शनिवारी दि. 28 डिसेंबर रोजी
थाटामाटात उद्घाटन झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी वजन काटा रूमचे कुलूप तोडून त्यातील फिटिंग, टेबल, खुर्ची तसेच कॉम्पुटर, प्रिंटर व इतर साहित्याची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड झाली असताना देखील ५-६ दिवस उलटूनही आजपर्यंत सभापती / सचिव यांनी कसलीही तक्रार पोलीस स्टेशनला दिली नाही, याचा अर्थ सभापती / सचिव हे या गोष्टीचे समर्थन करत आहेत का❓
त्यामुळे सभापती / सचिव यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून व पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आरोपींना योग्य ती शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, वजन काटा हा लवकरात लवकर चालू करावा असे पत्र माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात यांनी सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिले आहे.
सुधीर राळेभात यांनी सचिव व सभापती यांना पत्र पाठवून त्याची प्रत मा. सहायक निबंधक जामखेड यांना दिली आहे.