जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहेत. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, महिन्याच्या अखेर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पण या पदासाठी अर्ज करण्यास 50 वर्ष वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत.
केंद्रप्रमुखासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
नाशिक 122, नंदुरबार 33, धुळे 40, जळगाव 80, अमरावती 69, बुलढाण 65, अकोला 42, वाशिम 35, यवतमाळ 90, नागपूर 68, वर्धा 43, भंडारा 30, गोदिया 42, गडचिरोली 50, चंद्रपूर 66, छत्रपती संभाजीनगर 64, हिंगोली 34, परभणी 43, जालना 53, बीड 78, लातूर 50, धाराशिव 40, नांदेड 87, ठाणे 47,
रायगड 114, पालघर 75, पुणे 153, अहमदनगर 123, सोलापूर 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार आहे.