हळगाव येथे खा. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न..
जामखेड प्रतिनिधी,
जळगाव ता. जामखेड येथे ३ कोटी ७५ लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसामान्य लोकांना पाण्याची सोय झाली असून याच हळगाव गावात जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच लोकांची पाण्याची सोय होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, हाळगाव गावामध्ये विजेचा प्रश्न असेल किंवा डीपीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न येत्या काळात सोडवणार आहे. तसेच हळगाव व पंचक्रोशीतील ज्या ग्रामस्थांच्या कुणबी दाखला प्रमाणपत्रासाठी बीड जिल्हा येथे नोंदी आहेत, अशा नागरिकांच्या दाखल्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून येत्या दोन महिन्यात आपल्या नोंदी मिळून जातील असे आश्वासन देखील खा. विखेंनी दिले.
तसेच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दूध दर वाढीबाबत अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून दूध उत्पादकांना दिलासा दिला जाईल असा शब्द देखील खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला.
जल जीवन मिशन- ३ कोटी, दलित वस्ती अंतर्गत गावठाण मध्ये एलईडी दिवे बसवणे- ४ लक्ष, २५१५ अंतर्गत श्री भैरवनाथ मंदिरासमोर (कापसे वस्ती) सभा मंडप बांधणे- १० लक्ष, ३०५४ अंतर्गत हलगाव ते तुकाई वस्ती ते नानज रस्ता मजबुतीकरण- १५ लक्ष, ३०५४ अंतर्गत हळगाव ते मलठाण रस्ता मजबुतीकरण- २० लक्ष, क वर्ग तीर्थक्षेत्र अंतर्गत श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर देवस्थान विकास करणे- १५ लक्ष, भैरवनाथ विद्यालय येथे क्रीडांगण विकास करणे- ७ लक्ष आदी विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती सुजय विखेंनी दिली.
याप्रसंगी श्री.रवी सुरवसे, मा.सभापती डॉ.भगवान मुरूमकर, सरपंच ढवळे ताई, सोमनाथ पाचरणे, किसन ढवळे, कृषी उ बाजार समिती संचालक अंकुश ढवळे, मोहा सरपंच भीमराव कापसे, दिगंबर ढवळे, नवनाथ ढवळे, करण ढवळे, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.