खर्डा प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या खर्डा ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला असून भाजपाच्या संजीवनी वैजीनाथ पाटील या सरपंचपदावर विजयी झाल्या आहेत. या विजयाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली खर्डा ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली आहे. माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी ही ग्रामपंचायत ताब्यात घेत राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना मोठी शिकस्त दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरपंच नमीता आसाराम गोपाळघरे यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संजीवनी वैजीनाथ यांचा ९ मतांनी विजय तर रोहिणी प्रकाश गोलेकर यांना ८ मते पडून त्यांचा पराभव झाला आहे.
यावेळी कर्जत -जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे , तालुका अध्यक्ष अजय काशीद ,बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक वैजीनाथ पाटील, जामखेड शहराध्यक्ष बीभीषण धनवडे , ग्रा.स. सोपान गोपाळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे ,अरणगावचे सरपंच लहू शिंदे, नितीनसुरवसे, ग्रामपंचायत सदस्य राजू मोरे, महेश दिंडोरे, आप्पासाहेब ढगे , यांच्यासह अनके भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
: यावेळी विविध मान्यवरांची आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे म्हणाले की,
ही ग्रामपंचायत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यांच्या सरपंचांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संजीवनी वैजीनाथ पाटील यांच्या माध्यमातून भाजपाच्या ताब्यात आली आहे. जामखेड बाजार समीतीच्या सभापती निवडीनंतर आ. राम शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या युव्ह रचनेला यश आले. व तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायच्या सरपंचपदाच्या माध्यमातून आ. राम शिंदे साहेबांनी बाजार समिती सभापतीपदाच्या निवडीनंतर पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांना मोठी शिकस्त दिली आहे.
पै शरद कार्ले (बाजार समिती सभापती) : खर्डा ग्रामपंचायत आसो की जामखेड बाजार समिती यामाध्यमातून भाजपाचा झालेला विजय ही तर सुरुवात आहे. मात्र २०२४ आ. रोहित पवारांना कळेल की जामखेडकरांचा कौल कोणाच्या बाजूने आहे.
वैजीनाथ पाटील (बाजार समिती संचालक) आ. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पत्नी संजीवनी पाटील हिचा विजय झालेला आहे. यापुढे आ. राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व रवी दादा सुरवसे, संजय गोपाळघरे व अजय दादा काशिद यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा व परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी मी कटीबध्द राहिल अशी ग्वाही देतो
अजय काशिद (भाजपा तालुकाध्यक्ष) : खर्डा हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र काही काळासाठी आ. रोहित पवार यांनी या बालेकिल्ल्यात घुसखोरी केली होती. मात्र खर्डा भागातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आ. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युव्ह रचना करून संजीवनी पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व नवीन पदाधिकांऱ्याना शुभेच्छा देतो.
या निवडणूकीसाठी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी संतोष नवले, तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते व तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी काम पाहिले. या वेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.