नुसत्या प्रशासकीय इमारती बांधून विकास होत नसतो-मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
आज जामखेड येथे प्रा मधुकर आबा राळेभात यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी कार्यक्रते मा.नगरसेवक श्री अमित जाधव, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मोहन पवार, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राजेंद्र वारे सह कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना मधू आबा म्हणाले की,मागील विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आदर ठेवून आम्ही जामखेडच्या जनतेने एका स्थानिक कैबिनेट मंत्र्याना हजारो मतांनी पाडून रोहित
पवार यांना निवडून आणले. परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष न ठेवता बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी सर्व कार्यकत्यांना वागणूक दिली कोणत्याही
कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही.
सतत अपमान कारक वागणूक मिळाली.सदर मतदार संघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर प्रदेशाध्यक्ष,,जिल्हाध्यक्ष, तालुका, तालुकाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न लावता स्वतःचे नाव आईचे नाव व फोटो महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना नाव न वापरता आमदार रोहित पवार आयोजित कार्यक्रम केले जातात.जामखेड येथिल सायकल वाटप कार्यक्रमात 1700 विद्यार्थ्यांना सायकल वाटून जास्त जाहिर केल्या. सातत्याने असेच सोशल मिडीया प्रिंट, इलेक्ट्रोनिक मिडीयात खोटे वक्तव्य करतात त्यामुळे कुंचबना होते.
तालुक्यातील मूलभूत गरजांचा विकास न करता शाशकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला केला जातो. मतदार संघात विकास झाला नाही. अधिकात्यांची मनधरनी केली जाते.आजही तालुक्यामध्ये विज, पाणी, रस्ते हे ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करून अधिकायांना बसण्या उठण्यासाठी करोडो रुपये खर्च केला. त्याने रोजगाराचा व मुलभूत गरजांचा प्रश्न सुटत नाही.मतदारसंघातील एकही कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक न देता बारामती अॅग्रोच्या कामगारासारखी वागणूक देण्यात आली. या मतदारसंघात गेले 25 ते 30 वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांने अहोरात्र पक्षासाठी काम केले.
त्यांचाही सन्मान राखला जात नाही.बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असून त्यांचाही सतत अपमानीत केले जाते. बर्याच कार्यकत्यांना दम देवून भयभित केले जाते. किंवा विरोध करणाऱ्या कार्यकत्यांना
अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. हे कुठले राजकारण… (हुकूमशाही) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात जेष्ठ कार्यकर्त्याना मत मांडण्याच अधिकार दिला जात नाही. मतदारसंघात एखादा कार्यक्रम किंवा उद्घाटनासाठी आमदार उपस्थित नसेल तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते कार्यक्रम केला जातो पण कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाहि.या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदाचा राजीनामा देवून राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून बाहेर पडत आहोत.अशी भूमिका घेतली आहे पुढील पंधरा दिवसात काय भूमिका घेतात याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे.