- मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, कुस्ती संस्काराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा निर्माण केला आदर्श
जामखेड प्रतिनिधी,
पृथ्वी जर वाचवायची असेल तर झाडे लावली पाहिजेत. जग वृक्षारोपण करण्याची जाहिरात करत आहे. पण प्रत्यक्षात झाडे लावण्यासाठी हव्या त्या प्रमाणात पुढे येत नाही. मात्र जामखेड येथिल मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, कुस्ती संस्काराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा दिला आदर्श घालून दिला आहे. जामखेड शहरात कुस्तीचे संकुल उभारले जात आहे. या माध्यमातून येथे सशक्त, तंदुरुस्त व संस्कारी पिढी निर्माण होईल.
तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतील असे खेळाडू निर्माण होतील. या संस्काराने केलेले वृक्षारोपण हे पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. संस्कार फौंडेशनच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष बबन काशिद यांनी सुरू केलेल्या कामामुळे जामखेडचे वैभव वाढेल त्यांच्या या कामाला आपण सर्वांनीच पाठबळ व शुभेच्छा दिल्या पाहिजेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड येथिल मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, कुस्ती संस्काराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देण्यासाठी नियोजित कुस्ती संस्कार संकुलाच्या जागेवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथून निवृत्त वनअधिकारी घनश्याम भोसले, पै. विजय भासुरे, वृक्षप्रेमी अरिफभाई शेख, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद, पत्रकार संजय वारभोग, धनराज पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष बबन (काका) काशिद म्हणाले की, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून आज याठिकाणी धरतीचे संरक्षण व्हावे. यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. निसर्ग नियम आहे की तुमच्याकडे जितके वृक्ष असतील तेवढा निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल. मान्यवरांकडून जे वेगवेगळ्या माध्यमातून या मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन ला सहकार्य व मार्गदर्शन करतात त्यातुन या केंद्रातून संस्कारक्षम असे मोठे खेलाडू व सशक्त, तंदुरुस्त व संस्कारी पिढी निर्माण निर्माण होतील.
विशेष करून युवा पिढीसाठी या संकुलाचे काम असेल. तरूण राज्यातील, जिल्ह्य़ातील किंवा आपल्या जामखेड तालुक्यातील असेल त्यासाठी संस्थेचे काम असेल. आजचा भरकटत जाणाऱ्या तरूण योग्य मार्गावर चालावा यासाठी संस्थेने हाती घेतलेल्या कामाला समाजातील सर्व मान्यवरांकडून सहकार्य लाभले आहे. यापुढे ते मिळतच राहिल असाही विश्वास संस्थेचे अध्यक्ष बबन (काका) काशिद यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ, आंबा, फणस, चिंच, पिंपळ, अर्जुन अश्या समाज उपयोगी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.