जामखेड-राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व मुंबई मोर्चा नियोजन बैठक संपन्न

*जिथे इरादा पक्का असतो तिथे सरकारलाही झुकावच लागत — शिवगंगा मत्रे*

*आजची मुलींची परिस्थिती ही सैराट पिक्चर सारखी आहे.ही बदलली पाहिजे-डॉ पल्लवी सुर्यवंशी*

जामखेड प्रतिनिधी,

मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने राजमाता जिजाऊ मा साहेब यांची जयंती उत्साहात साजरी.

यावेळी जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा.कविता जगदाळे डॉ पल्लवी सुर्यवंशी व शिवगंगा मत्रे यांच्या हस्ते करून जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रा मधुकर राळेभात प्रास्ताविक करताना म्हणाले
महाराष्ट्राने राजमाता जिजाऊ यांची जयंती एक सण म्हणून साजरा झाला पाहिजे ज्या राजमातेने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न दिले आणि मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड मराठा क्रांती मोर्चाचे कौतुक केलं आहे जामखेड येथील साखळी उपोषण हे 64 दिवस चालले होते आणि नगर येथे येनाऱ्या मोर्चाचे स्वागत करण्यासाठी आपण जाणार आहोत.

यावेळी बोलताना कविता जगदाळे मॅडम बोलताना राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत जिजाऊ साहेब यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाना केलेले मार्गदर्शन आणि समाजाप्रती असणारे प्रेम, हे दाखवून दिले आहे.दिन दुबळ्या प्रजेची केलेली काळजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य आपण विसरून चालणार नाही आणि आपण सर्वांनी स्रीयांचा आदर केला पाहिजे.आताची राजकीय परिस्थिती पाहता नैतिक मूल्य जपली पाहिजे परंतु ही सर्व मूल्य पायदळी तुडवले जात आहेत.आरक्षण ही मराठा समाजाला गरज आहे,मराठा समाज समाज हा गरीब आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे आम्ही सर्व महिला मनोज जरंगे यांच्या पाठीमागे आहोत.

यावेळी जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केलेली विद्यार्थिनी शिवगंगा मत्रे हिने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
मी जिजाऊ बोलतेय आया बहिणीची आब्रू लुटणाऱ्या पाटलांच्या पाय तोडायला लावणाऱ्या शिवबाची आई बोलतेय,आपल्या आया बहिणीची पायमल्ली होत असताना आपण गप्प का शिवबा तुम्हाला परत यावच लागेल,शिवबा मराठ्यांच्या आरक्षणासाठी तुम्हाला परत यावचं लागेल,शेतकरी बांधव कष्टकरी बांधव भरकट्त चालले त्यासाठी तुम्हाला यावं लागेल,तुमची आई तुम्हाला साद घालते रायगडाच्या समाधी तून यावंच लागतंय.एक लढाई संपली तरी आरक्षणाची लढाई बाकी आहे आणि ती जिंकण्याची बाकी आहे.

प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश पाटील शुभेच्छा देताना म्हणाले ,नुसती जयंती साजरी न करता आपण या महापुरुषांचा विचार समाजापर्यंत पोहचवला पाहिजे,यांचा इतिहास वाचला तर अंगावर कटा उभा राहतो त्या काळात प्रतिकूल परिस्थिमध्ये केलेले कार्य शौर्य कसं असेल.धर्म निरपेक्ष राज्य,धर्माने चालणारे शासन असावं हा विचार मनात आला आणि छत्रपती घडवले.चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव राहणार आहे.आरक्षणाचा आपला लढा आपण शांतेत केला आहे आता मुबई ला जाण्याची गरज न पडावी अगोदरच न्याय मिळावा अशी आशा बाळगतो.

अध्यक्षीय भाषणात डॉ पल्लवी सुर्यवंशी म्हणाले,
एक विचार स्वराज्याचा अवघा पेटला महाराष्ट्र,नेतृत्व क्रतुत्व शौर्य मंहजे राजमाता जिजाऊ ,जिझुनि मरावे पण खिजूनी मरू नये हे शिवबना शिकवले,आई च्या गर्भात बाळवर चांगले विचार आईचे पाहिजे आता गरोदर माताना वडपावचे डोहाळे लागतात.आणि मोबाईल वर झिंघात गाणे,आजची मुलींची परिस्थिती ही सैराट पिक्चर सारखी आहे.ही बदललं पाहिजे. तेव्हा स्री यांनी खरे जिजाऊ साहेबांच्या विचार पुढे नेले पाहिजे.मनोज जरांगे पटलाना माझा मानाचा मुजरा ज्यांनी सर्व समाज एकत्र केलं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हा संघटित होऊन लढा द्यायचा आहे.ना वकायचे ना झुकायचे सन्मानाने राहायचे आणि जगायचे.

यानंतर केदार रसाळ यांनी मुंबई मोर्चाचे नियोजन सांगताना नगर मध्ये होणारी सभेसाठी तयारी व तेथे लागणारी स्वयंसेवक जामखेड मधून 100 जाणार आहेत हे नियोजनामध्ये असतील व त्यांचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि ते आपण तालुक्यामध्ये गावागावमध्ये पाठवणार आहोत.येत्या 22 तारखेला आपण नगर येथे या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे,वाहने घेताना आपण मोठं मोठी टेम्पो करुझर अशी वाहने घायची आहेत, सुक्का अन्न बरोबर घायच आहे जास्तीत जास्त मराठा बांधवानी सहभागी व्हायचं आहे हा आपला शेवटचा लढा आहे.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *