मनोज जरांगे पाटील यांच्या 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रेकार्ड ब्रेक सभेसाठी जामखेड मराठा क्रांती मोर्चा सज्ज!!! नियोजन बैठक संपन्न..
जामखेड प्रतिनिधी,
मराठा आरक्षणासाठी 17 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यानुसार शुक्रवार ६ आँक्टोबर रोजी जामखेड जाहीर सभा होणार आहे. रेकार्ड ब्रेक सभेसाठी आज मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक संपन्न झाली. यानंतर परत ४ तारखेला बैठक होणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या
समन्वय यांनी दिली.
सभेच्या नियोजनासाठी दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. जामखेड येथील साई मंगल कार्यालय, नगर रोड, जामखेड येथे नियोजन बैठक
संपन्न झाली
या बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती बैठकीसाठी पुढील समाजबांधव उपस्थित होते. प्रा. मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, अवधूत पवार, विजयसिंह गोलेकर, आण्णासाहेब सावंत, गुलाब जाभंळे, तात्यासाहेब पोकळे, रवी सुरवसे, राजेंद्र पवार, पांडुराजे भोसले, मच्छिंद्र पोकळे, विकास राळेभात, केदार रसाळ, राजू गोरे, राहुल उगले, पवन राळेभात, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, दत्तराज पवार, संतोष थोरात, दत्तात्रय भोसले, बाबू शिंदे, रमेश ढगे, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, मनोज भोरे, राम निकम, संभाजी ढोले, बाबू शिंदे, संभाजी देशमुख, उदयसिंह पवार, बबनराव गव्हाणे, शिवाजी कोल्हे, तात्यासाहेब बांदल, संतोष उगले, जालिंदर भोगल, विकी उगले, विष्णू सांगळे, योगेश सुरवसे, स्वप्नील मोरे, अशोक शेळके, प्रशांत कोल्हे, हरीभाऊ आजबे, अमर चिंचकर, तुकाराम ढोले, गणेश शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या तसेच सभेचे ठिकाण तहसील कार्यालय समोर ठिकाण असेल
जर पाऊस असेल तर विठाई मंगल कार्यालय कर्जत रोड जामखेड असे ठिकाण असेल. यावेळी
स्वागत समिती, शहरात भव्य दिव्य असे स्वागत,
स्टेज व सत्कार नियोजन समिती, प्रसिद्धी व प्रचार समिती, आर्थिक समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच कार्यक्रम स्थळी शाहीर कांबळे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल
भूम वरून जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे प्रथम खर्डेकरांच्या वतीने स्वागत करण्यात येईल नंतर चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर स्मृती स्तंभाचे दर्शन यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने पाडळीफाटा येथे स्वागत आणी नंतर जामखेड येथे जाहीर सभा होईल.
यावेळी राम निकम, अवधूत पवार, गुलाब जाभंळे, कुंडल राळेभात, राहुल उगले, पवन राळेभात, प्रा. मधुकर राळेभात, रवी सुरवसे, आण्णासाहेब सावंत, यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जातिनिहाय जनगणना आवश्यक आहे. मराठा आमदार व मंत्री यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. मराठा नेत्यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत फक्त वापर केला आहे. चाळीस दिवसांनंतर आपली भूमिका काय याविषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच पुढील नियोजन बैठक ४ तारखेला याच दिवशी होणार आहे.