*आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत व जामखेड तालुक्यात दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन*
*मतदारसंघासह परिसरातील शेकडो दिव्यांग नागरिकांना शिबिरातून झाला फायदा*
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय जामखेड व आरोळे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून कर्जत व जामखेड शहरामध्ये दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत तपासणी करून घेतली. या शिबिरात पात्र झालेल्या दिव्यांग नागरिकांना येत्या काही दिवसात प्रमाणपत्र देखील मिळणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून कर्जत जामखेड तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तपासणी करता आली.
मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम पार पडत आहेत. अशातच दिव्यांग तपासणी शिबिर कर्जत आणि जामखेड येथे संयुक्तरीत्या पार पडले असून या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आणि तपासणी करून प्रमाणपत्र मिळवणे या सगळ्या त्रासातून सुटका मिळाली असून आता मतदारसंघातच तपासणी झाल्याने त्यांना आपल्या तालुक्यातच प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.
कर्जत आणि जामखेड मिळून 700 हून अधिक दिव्यांग नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 350 दिव्यांग हे प्रमाणपत्रासाठी पात्र झाले आहेत. अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असल्याने नागरिकांकडूनही आमदार रोहित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.