जामखेड खर्डा चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन…
मंगेश दादा आजबे यांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजक !
हजारोंच्या संख्येने या आंदोलनाला जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाज उपस्थित!
जामखेड प्रतिनिधी –
आज जामखेड खर्डा चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते बोलताना म्हणाले की, पोलीस हे जनतेचे सेवक आहेत जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत आम्ही उठणार नाही सत्ता हि येत असती किंवा जात असती जनता तुम्हाला 2024 ला तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ना मर्द सरकारच करायचे काय खाली मुडके वर पाय अशी घोषणा देण्यात आली रात्री दिवस अभ्यास करून सुध्दा नौकऱ्या लागत नाही यांचे कारण म्हणजे आरक्षण आहे.
गृहमंत्र्यांच्या आदेशाने आमच्या आया, बहिणीवर लाटीहल्ला करण्यात आला मराठ्याच्या आमदार ना लाजा वाट्याला पाहीजे होते. खुर्चीसाठी लाचार झाले आहे जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर मतदानावर बहिष्कार टाकाऊ सर्व मराठा समाजाने एकत्र यावे यावेळी बोलताना सांगितले आहे. तसेच
सर्व जामखेड तालुक्यातील मुस्लीम बांधवांना च्या वतीने मराठा बांधवांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आम्ही अता पर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत मराठा समाज गरिब समाज आहे आमचा कोणत्याही शासनाला विरोध्द नाही आम्ही आमच्या न्यायासाठी एकत्र आलो आहे मुस्लिम बांधवांनी जो आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करण्यात आले. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावा अशी विनंती करण्यात आली.
जामखेड पत्रकार बांधवांच्या वतीने यासीन भाई शेख यांनीही पाठिंबा दिला . यावेळी जामखेड तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
येणारे पिढीसाठी आरक्षण पाहीजे जरांगे पाटील यांना जर काही कमी जास्त झाले तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज गप्प बसणार नाही-मंगेश आजबे