*कर्जत-जामखेड एमआयडीसी मंजुरीसाठी आमदार रोहित पवार यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.*
*युवा व नागरिकांच्या उपस्थितीत पोस्टाने पाठवले पंतप्रधान कार्यालयाला पत्र*
कर्जत/ जामखेड | वारंवार पाठपुरावा करून व मंत्र्यांच्या भेटी घेऊन तसेच अधिवेशनातही एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा उपस्थित करून देखील कर्जत जामखेड एमआयडीसीचा प्रश्न हा मार्गी लागत नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सर्व नागरिक युवा यांच्या वतीने पत्र लिहून त्यांच्या भावना पत्रामध्ये व्यक्त करत कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरीच्या मुद्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि त्यांनी याबाबत राज्य शासनाला मंजुरीसाठी निर्देश द्यावेत, अशी विनंती देखील केली आहे.
कर्जत शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये आमदार रोहित पवार यांनी स्वतः लिहिलेले पत्र मतदार संघातील नागरिक व युवांच्या उपस्थितीत पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. यावर आता पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आह