*या बंधुचा आदर्श घेऊन युवा तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे – आ. निलेश लंके*
*जामखेड येथे आ. निलेश लंकेंच्या उपस्थितीत हाॅटेल ‘सेलिब्रेशन्स्’ चे उद्घाटन संपन्न*
जामखेड प्रतिनिधी,
युवा नेते समीर चंदन व अदित्य चंदन या युवा उद्योजकांच्या मातोश्री असलेल्या मंदा अक्का चंदन यांनी अतिशय कर्तुत्ववान आपली मुलं घडवण्याचे काम केले आहे. एकिकडे अदित्यने महाराष्ट्रातील चार ते पाच जिल्ह्य़ात अमूल व फुड एजन्सीचे जाळे निर्माण करून आपल्या यशस्वी कारभाराचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. तर समीरने आपले जामखेड सारख्या गावात हेल्थ कल्बचा व्यवसाय चांगल्या पध्दतीने चालवून अनेक तरूणांना विविध क्षेत्रात मोठी संधी निर्माण करून दिली. समाजात एवढा विस्कळीत पणा असताना दोघा भावांचा एकोपा हा समाजापुढे आदर्श ठेवतो.
आज आपल्या आजीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या हाॅटेल
सेलिब्रेशन्स मुळे जामखेड शहराच्या वैभवात भर पडली असून सर्व स्तरातील हाॅटेलींगच्या शौकीनांसाठी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा जामखेडकरांनी आवश्य आनंद घ्यावा असेही आवाहन यावेळी पारनेरचे आ. निलेश लंके यांनी केले.
जामखेड शहरातील नगर रोड येथे युवा उद्योजक समीर चंदन व आदित्य चंदन यांच्या माध्यमातून जामखेड करांच्या वैभवात भर घालणारे खास जामखेडकरांच्या सेवेत सेलिब्रेशन्स् ची मेजवाणी हाॅटेल सेलिब्रेशन्स् या भव्य दालनाचे उद्घाटन दि.२६ नोव्हेंबर रोजी पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये तसेच शकुंतला चंदन व लक्ष्मीबाई चंदन, मंदाताई चंदन यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, GST आयुक्त नागेश जाधव,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, दिनेश शामशेट्टी, गोकुळ दास वैष्णव, संजय गोडबोले गुरुजी, निलेश तिवारी, डॉ.भास्कर मोरे, शहाजी राळेभात, प्रा. लक्ष्मण ढेपे, साधु बोराटे, बाजार समिती संचालक नंदकुमार गोरे, काकासाहेब गर्जे, माजी सरपंच नरेंद्र जाधव, पवन राळेभात, गणेशशेठ डोंगरे, संभाजी राळेभात, दादा रिटे, सरफराज पठाण, हरिभाऊ आजबे, शुभम जाधव, डॉ.नरसाळे, अरविंद जाधव, सनी सदाफुले, विठ्ठल शिंदे तसेच सौ. संजना ताई समिर चंदन, सौ.आरती ताई अदित्य चंदन आदींसह मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. लंके म्हणाले की, बहुजन समाजातील मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे. कारण व्यवसायात मोठ्या संधी असतात. व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला फायदा व्हावा या भावनेतून समीर व अदित्य हे बंधू व्यवसाय करत आहेत. हाॅटेल व्यवसाय करताना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून तसेच स्वच्छतेला महत्व द्यावे लागते. या व्यवसायसाठी आवश्यक असणारे सर्व गुण दोन्ही बंधूंमध्ये आहेत. तरूणांनी चंदन बंधुचा आदर्श समोर ठेवून व्यवसायात उतरावे. मी राजकारण करताना त्याचा समाजाला कसा फायदा होईल याचाच विचार करून काम करतोय. सत्तेचा फायदा सर्व सामान्यांना मदत व त्यांचे अश्रू पुसण्यासाठी केला. असे म्हणत आ. निलेश लंके यांनी चंदन बंधुना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन प्रसंगी कर्जत – जामखेड चे आमदार रोहित पवार, विधान परिषद सदस्य प्रा. राम शिंदे, विधान परिषद सदस्य सुरेश( आण्णा ) धस यांनी दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी GST आयुक्त नागेश जाधव, डॉ. भास्कर मोरे, संतोष वारे यांनीही आपल्या मनोगतून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे यांनी तर आभार समीर चंदन यांनी मानले.