*खर्डा येथे तब्बल ३२ वर्षांनी भरली शाळा,विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तब्बल 32 वर्षांनी दहावीतील विद्यार्थी आले एकत्र .१९९२ च्या सालच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी एकत्र आले. त्यांचे खर्डा येथे अनोखे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. रत्न सुरेश कॉम्प्लेक्समध्ये हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
स्नेहमेळाव्याची कल्पना वैष्णवी हॉटेलचे संचालक कल्याण सुरवसे, संतोष थोरात यांची मित्रांसह चर्चा झाली. त्यातून हा कार्यक्रम घडवून आणला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०२३ तारीख निवडण्यात आली. गावातील मित्रांनी अहोरात्र कष्ट करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. त्यानुसार त्यांच्या सर्व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली. येणाऱ्या मित्रांना तोफेची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच येणाऱ्यांची नाव नोंदणी केली. त्यानंतर सर्व शिक्षकांचा मानसन्मान करून त्यांना फेटे बांधून सन्मान केला. वाजत गाजत जुन्या शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली.
रॅली पाहण्यासाठी गावातील प्रत्येकाने याचा आनंद घेतला. शाळेत पोहचल्यावर मित्रांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. फेरीनंतर वर्ग मैत्रिणींना माहेरची साडी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची परवानगी देऊन प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. अडीअडचणीतील मित्रांना सहकार्याची भूमिका मांडण्यात आली. आलेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, मित्र मैत्रिणी, पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी कल्याण सुरवसे
संतोष धस, संतोष थोरात, रवी सुरवसे, आजिनाथ सुरवसे, महादेव वडे, दीपक चव्हाण, कल्याण सुरवसे, रामलिंग होडशीळ, रामदास घुगे, नीलेश होमकर, मंगेश गुरसाळी, प्रवीण होमकर, प्रकाश सोनटक्के, धनसिंग साळुंखे, तसेच महिला आघाडीतील भारती सहानी, सीमा दिवटे, वैशाली साखरे, वैशाली चावणे, निर्गुणा जोरे, अजय बडगुजर, मंगेश गुरसाळी यांनी विशेष परिश्रम घेतले.